Download App

भीमा पाटस कारखाना नवाज शरीफचा आहे का? राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut On Bhima Patas Sugar Mill :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकरावर पुन्हा एकदा टीका केली आहे. संजय राऊत हे काल संध्याकाळी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याला भेट द्यायला आले होते. त्यावेळी पोलिसांना त्यांना अडवले होते. तसेच तेथील परिसरात कलम 144 लावण्यात आले होते. यावरुन राऊत चांगलेच संतापले आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये या सगळ्या मुद्द्यावरुन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर मोठा आरोप केला आहे. त्यांनी राहुल कुल चेअरमन असलेल्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. यानंतर संजय राऊत हे काल भीमा पाटस कारखान्याच्या परिसरात आले होते. त्यांना यावेळी पोलिसांना यावेळी अडवले होते. यावरुन त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये जोरदार हल्लाबोल केला आहे.

Abdul Sttar : हनुमानासारखा भक्त असतो तर….; विखेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सत्तारांचं मोठ विधान

हा कारखाना काय नवाज शरिफ यांचा आहे का, असे म्हणत राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. या कारखान्यामध्ये 500 कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे. माझ्याकडे याची सगळी कागतपत्रे आहेत. यावर आता देवेंद्र फडणवीस का गप्प आहेत, असा सवाल त्यांनी केला आहे. आम्हाला तिथे जाण्यापासून रोखण्यात आले. त्याठिकाणी राहुल कुल यांच्या दबावामुळे कलम 144 लावण्यात आले होते. तरी सुद्धा आम्ही तिथे गेलो, असे राऊत म्हणाले आहेत.

Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत हालचाली, ‘या’ नेत्याने दिला दुजोरा

तसेच भारतीय जनता पक्षाचे 60 ते 70 प्रकरणं माझ्याकडे आहेत. यातील काही प्रकरणं मी ईडी व सीबीआयकडे पाठवत आहे. भीमा पाटसचे हे प्रकरण मी दिल्लीमध्ये ईडी अधिकाऱ्याला देणार आहे. नाही झालं तर हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट आहेतच, असे म्हणत त्यांनी कुल यांना इशारा दिला आहे.

Tags

follow us