Download App

‘ते दुसऱ्यांवर आकडा लावतात’; राऊतांची भाजप अन् अजितदादांवर टोलेबाजी

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut On BJP :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेतून जोरदार टोलेबाजी केली आहे. राऊत म्हणाले की, ज्यांच्याकडे आकडा आहे मुख्यमंत्री होण्याचा ते मुख्यमंत्री होत नाहीत. ते दुसऱ्यांवर आकडे लावतात, असा टोला संजय राऊतांनी भाजपला लगावला.

अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी चर्चा आहे. तसंच दिल्लीश्वराची तशी इच्छा आहे, असं त्यांना विचारलं असता राऊतांनी या मुद्द्यावरुन भाजपला चांगलेच टोले लगावले. एकनाथ शिंदेंकडे १४५ आमदार संख्या कुठे होती? अजित पवार हे काही बहुमत आहे म्हणून मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांना कुणीतरी मुख्यमंत्री करणार आहे. ज्यांच्याकडे आकडा आहे मुख्यमंत्री होण्याचा ते मुख्यमंत्री होत नाहीत. ते दुसऱ्यांवर आकडा लावतात.

अमित ठाकरे यांच्या गाडीला फास्ट टॅग होता, काय सांगतो रस्ते मंत्रालयाचा नियम…

राऊत यांनी यावेळी शिंदे गट व अजित पवार गट यांच्यावर देखील राऊतांनी निशाणा साधला. राऊत म्हणाले की, “लोक एका भीतीपोटी पक्ष सोडत आहेत आणि पक्षांतरं होत आहेत, आपण पाहिलं आहे. ज्यांनी पक्षांतरं केली त्यांचा एक पाय तुरुंगातच होता.. मग ते शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील. त्यांनी त्यांचे निर्णय घेतले आहेत घेऊ द्या” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सरसावले! पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश…

दरम्यान, अजित पवार यांनी भाजपसोबत येत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर चर्चा सुरु आहे ती त्यांच्या मुख्यमंत्री होण्याची. कारण एकनाथ शिंदेसह १६ आमदार अपात्र ठरतील असं बोललं जातं आहे त्याआधीच अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाईल आणि तशी दिल्लीश्वरांची इच्छा आहे या संदर्भातला प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावर संजय राऊत यांनी भाजपाला टोले लगावत उत्तर दिलं आहे.

Tags

follow us