Download App

‘सिल्वर ओक’वर काय खलबतं झाली? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं…

काल उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची सिल्वर ओकवर भेट झाली. या भेटीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाल्याचं समोर आलंय. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असल्याचं खासदार संजय राऊत स्पष्ट केलंय. आज सकाळी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान संजय राऊतही ठाकरे यांच्यासोबत होते.

Narhari Zirwal : पांढरा सदरा, गांधी टोपी आणि हिरवं लुगडं; जपान दौऱ्यापूर्वीचा झिरवळांचा लूक चर्चेत

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, सिल्वर ओकमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रदीर्घ आणि महत्वाची भेट झाली.शरद पवार हे देशातले मोठे नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्यासोबत देशातल्या आणि राज्यातल्या घडामोडींवर आणि भविष्याची दिशा ठरविण्यावर चर्चा झाल्याचं राऊत यांनी सांगितलं आहे.


Sheetal Mhatre : लाचारांची स्वारी ‘सिल्व्हर ओक’च्या दारी…

यावेळी सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे. शरद पवार आणि संजय राऊत उपस्थित होते. तसेच चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. बाळासाहेबांचा अपमानाप्रकरणी ॲक्शन घ्या, निर्णय घ्या, मग आम्हाला सांगा, असं खुलं आव्हानच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांनी दिलंय.


शाहिद आफ्रिदीला बाबर आझम कर्णधारपदी नको? पाक क्रिकेटमध्ये खळबळ

दरम्यान, बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरेंचा संबंध नसल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावर संजय राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट करत सत्ताधाऱ्यांनी थेट आव्हानच दिलंय.

Tags

follow us