शिंदे सरकारच्या चड्डीची नाडी, दिल्लीकरांच्या हाती; राऊतांची पातळी घसरली 

Sanjay Raut On Eknath Shinde: शिवसेना (Shiv Sena) फुटल्यानंतर ठाकरे गटाने (Thackeray group) या फुटीचं खापर थेट भाजपवर फोडलं होतं. त्यातमध्ये देखील या फुटीमागे भाजपचे हात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात होता. तसेच मुख्यमंत्र्यांच्या वारंवार होणाऱ्या दिल्लीवाऱ्यांवरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath […]

sanjay raut eknath shinde devendra fadnavis

sanjay raut eknath shinde devendra fadnavis

Sanjay Raut On Eknath Shinde: शिवसेना (Shiv Sena) फुटल्यानंतर ठाकरे गटाने (Thackeray group) या फुटीचं खापर थेट भाजपवर फोडलं होतं. त्यातमध्ये देखील या फुटीमागे भाजपचे हात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात होता. तसेच मुख्यमंत्र्यांच्या वारंवार होणाऱ्या दिल्लीवाऱ्यांवरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे.

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) चड्डीची नाडी म्हटलेलो नाही तर सरकारच्या चड्डीची नाडी दिल्लीच्या हातात असल्याचे यावेळी त्यांनी म्हटल आहे. मुख्यमंत्री तर बेल्ट वापरत आहेत. तोदेखील आता लूझ झाला आहे. नड्डा यांच्या स्वागताचे बॅनर्स मुख्यमंत्र्यांनी लावलेले आहेत. बाळासाहेब यांचे चेले बोलता आणि नड्डा यांचे बॅनर्स तुम्ही लावतात. ही लुच्चेगिरी भाजपाच्या नेत्यांच्या स्वागतांचे बोर्ड लावतात. तुम्ही स्वतःला शिवसेना समजता मग नडयांचे स्वागत भाजपाच्या नेत्यांना भेटायला दिल्लीला जायचं हा चायना मेड माल आहे, अशी घणाघाती टीका राऊतांनी यावेळी केला आहे.

इतकी माणसे मरत आहेत .महाराष्ट्रात दीडशेच्या आसपास लोक मेली आहेत आणि मुख्यमंत्री दिल्लीला आहेत .रात्री बारा वाजता पहाटे चार वाजता दिल्लीला जातात दिल्लीला काय आहे .याचा अर्थ हे सरकार दिल्लीने बनवलेले आहे. एकनाथ शिंदे यांना सुद्धा ईडी आणि सीबीआयने फोडलं आहे. देवेंद्र फडणवीस हे मदारी आहेत. ते डमरु वाजवतात आणि हे दोन माकडे नाचतात, अशी घणाघाती टीका आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले.

Ajit Pawar : अजितदादा 20-25 वर्षांनी CM होतील; भाजप नेत्याचा खोचक टोला

संजय राऊत पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचा गट म्हणजे कसली शिवसेना. शिंदेंची शिवसेना म्हणजे चायना माल आहे. त्यांची शिवसेना मेड इन चायना आहे. कारण त्यांचे सरकारच दिल्लीने बनवले आहे. त्यांचे जे सरकार आहे, ते ईडी, सीबीआयने बनवले आहे. एकनाथ शिंदेंना ईडी, सीबीआयने फोडले आहेत. परंतु त्यांच्या हातात काही नाही. फडणवीस डमरू वाजवतात आणि ते नाचत असल्याची खोचक टीका संजय राऊतांनी यावेळी केली आहे.

Exit mobile version