2000 Rupees Note: जेव्हा नोव्हेंबर 2016 साली प्रथम भारतात मोदी सरकारने नोटबंदी केली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील जनतेला म्हणाले होते. की जर हा नोटबंदीचा निर्णय चुकीचा ठरला तर मला भर चौकात फाशी द्या. यावर दोन हजार रूपांच्या दुसऱ्या नोटबंदी नंतर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात… मोदी स्वत: म्हणाले होते, काही चुकीचे घडल्यास मला जाहीर चौकात फाशी द्या. आता लोकांनीच चौकाचौकात जाहीर फाशीचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. पंतप्रधान मोदींनी स्वत: वधस्तभांकडे गेले पाहिजे.
रिझर्व्ह बँकेने काल दोन हजार रुपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण प्रत्यक्षात या नोटांची कायदेशीर वैधता संपवलेली नाही. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांकडे असणाऱ्या दोन हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये बदलून देण्याचे सुविधा तब्बल 4 महिने उपलब्ध करून दिली आहे. तरी देखील ही नोटबंदीच केली आहे, असा दावा करून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर निशाणा साधला
https://www.youtube.com/watch?v=WYyIDGgDii0&t=2s
संजय राऊत म्हणाले…
संजय राऊत यांनी शनिवारी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, देशाची व्यवस्था सरकारच्या गुलामाप्रमाणे काम करत आहे. बहुतांश काळा पैसा हा भाजप नेते आणि त्यांच्या मित्रांकडे असून त्यांच्याकडे नोटा बदलून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. काळा पैसा परत आणण्यासाठी नोटाबंदी झाली, पण काळा पैसा परत आला का? ते म्हणाले की, सर्वाधिक काळा पैसा भाजप नेते आणि त्यांच्या मित्रांकडे आहे. भाजपने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे.
2000 ची नोट चलनात कशी आली होती? अन् यापूर्वी कधी कधी झाली होती नोटबंदी ?