Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) राजकीय पक्षांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. यंदा भाजपला हरवायचेच या इराद्याने विरोधी पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत तर दुसरीकडे सत्ता राखण्यासाठी भाजपने (BJP) आधीपासूनच प्लॅनिंग सुरू केले आहे.
महाराष्ट्रातही घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीबाबत महत्वाचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत शिंदे गटाच्या नेत्याने मोठा खुलासा केला आहे. राज्यातील लोकसभेच्या सर्व 48 जागा शिवसेना, भाजप युतीने लढायच्या असून यासाठी एक सर्व्हेक्षण केले जाणार आहे. कोणाला कोणत जागा दिली जाणार याचा निर्णय घेतला जाईल. तसे आदेश दिल्लीतून आले आहेत, अशी माहिती आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिली.
महाविकास आघाडी सत्तेत आल्यास मुख्यमंत्री कोणाचा? शरद पवारांनी दिलं ‘हे’ उत्तर
शिरसाट पुढे म्हणाले, छत्रपती संभाजीनगरची जागा आधी शिवसेनेकडे होती. आता यावेळी या जागेसाठी कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार याबाबत सर्व्हेक्षण होईल त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.
या जागेसाठी डॉ. भागवत कराड असतील की रोहयो मंत्री सांदिपान भुमरे यांना उमेदवारी मिळेल किंवा तिसऱ्या कुणाला संधी मिळेल याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. मला जर लोकसभा निवडणूक लढण्यास सांगितले तर मी तयार आहे, असे शिरसाट यांनी सांगितले.
Karnataka Assembly Election : राहुल गांधींची डिलिव्हरी बॉयसोबत स्कूटर सवारी…
लोकसभा निवडणुकीच्या आधी कर्नाटकात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याआधी झालेल्या तीन राज्यांच्या निवडणुकांत भाजपला चांगले यश मिळाले होते. त्रिपुरा राज्यात सलग दुसऱ्यांदा यश मिळवण्यात भाजप यशस्वी ठरला. नागालँड आणि मेघालयातही भाजपला चांगले यश मिळाले. त्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यानंतर आता थोड्याच दिवसात लोकसभेच्या निवडणुका होत आहे. या दृष्टीने भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात तीन पक्षांना टक्कर देण्यासाठी शिंदे गटाला बरोबर घेण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत अद्याप निर्णय मात्र झालेला नाही. त्यानंतर कुणाला किती जागा मिळणार हे स्पष्ट होईल.