Sanjay Shirsat on Sanjay Raut after criticize Sharad Pawar : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याच्या मुद्द्यावरून पवारांवर टीका केली आहे. त्यानंतर आता शिंदेंची शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. त्यात आता शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले आहे.
ठाकरेंच्या रॅलीत दहशतवादी चालतो पण पवारांनी शिंदेंचा सत्कार केलेला नाही; शिरसाटांचा निशाणा
एका वृत्त वाहिनीशी बोलताना शिरसाट म्हणाले की, संजय राऊत हे ज्या पद्धतीने टीका करतात. ते पाहता संजय राऊत यांचे तोंड उद्धव ठाकरेंनी बंद करायला हवं. दुसरीकडे शरद पवार देखील आमचे विरोधक आहेत. आम्ही देखील त्यांच्यावर टीका करतो. मात्र आम्ही या स्तरावर कधीही टीका करत नाही.
Somnath Suryawanshi Death : ‘सुरेश धसांची डुप्लिकेट भूमिका’; प्रकाश आंबेडकार बरसले
शरद पवारांवर राऊतांनी त्यांनी जी टीका केली आहे. त्याचा अर्थ त्यांनी त्यांना अप्रत्यक्षरीत्या गद्दार म्हटलं आहे. तसेच याचा दुसरा अर्थ राऊतांना महाविकास आघाडीत राहायचं दिसत नाही. त्यामुळे पवारांनी ज्या राऊतांना हात धरून पुढे आणले आहे. त्यांनीच त्यांच्यावर चिखलफेक केली आहे.
Virat Kohli ने इतिहास रचला, सचिन तेंडुलकरला मागे टाकत केला ‘हा’ खास विक्रम
तसेच संजय राऊत एक दलाल आहे. महाभारतातील शकुनी आहे. त्यांनी प्रत्येकाची घरं फोडली आहे. उद्धव ठाकरे शरद पवार यांचीही घरं फोडली आहे. त्यामुळे आता त्यांची देखील वेळ आली आहे. त्यांच्या पापाच्या गडा भरला आहे. त्याचबरोबर दिल्लीतील साहित्य संमेलन आणि महदजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये गेलेल्या शरद पवारांवर टीका करणाऱ्या राऊतांनी सर्वांनाच दलाल म्हटले. त्यांनी साहित्यिकांचाही अपमान केला. असं म्हणत शिरसाटांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे.