Laxman Hake Allegations On Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आज 8 जानेवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी लक्ष्मण हाके बोलत (Santosh Deshmukh Murder Case) होते.
यावेळी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या आणि राजगुरूनगरमधील दोन चिमुकल्या मुलींची अतिशय निर्दयीपणे हत्या झाली. महाराष्ट्रात घडत असलेल्या या सर्व घटनांचा निषेध व्यक्त करत आहे. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या हत्या या महाराष्ट्राची शरमेने मान खाली घालणाऱ्या घटना आहे. गेल्या काही दिवसांत गुन्हेगाराचा समाज शोधून त्यांना गुन्हेगारीच्या कठड्यांमध्ये उभा करण्याचा प्रयत्न पुढाऱ्यांकडून होतोय. त्यासाठी ओबीसी समाजाची निदर्शने होत आहे. आमच्या नेतृत्वाने कधीही या गुन्ह्यांचे समर्थन केलेलं नाही.
ताज अन् ओबरॉय हॉटेलमधील ‘ते’ CCTV फुटेज बाहेर काढा, महाराष्ट्र हादरून जाईल…; उत्तमराव जानकर
काही नेते निवडून आले आणि एका नेता आरक्षणाच्या आंदोलनातील अपघातामुळे नेता झाला. जरांगेंची भाषा आता सुरेश धस करत, असल्याचा हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी केलाय. एखाद्या कार्यालयात गेलं, किंवा शाळा-महाविद्यालयांत गेलं की आडनावावरून जात काढली जाते. आष्टी पाटोद्याच्या आमदाराने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण सुरू केलं. या माणसाची भाषा निवडणूक होईपर्यंत एक होती, निकालानंतर ती वेगळी होती. गुलाल पडलेला माणूस आपल्याच पक्षातील नेत्यावर टीका करतो, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केलीय.
‘…नंतर समजलं मी चोराकडेच आलेय’; धनंजय मुंडेंवर सारंगी महाजनांचे गंभीर आरोप
धनंजय मुंडे निवडून येवू नाही म्हणून प्लॅन केला गेला. नंतर तो मंत्री होवू नये, अन् मंत्री झाल्यानंतर पालकमंत्री होवू नये म्हणून प्लॅन केला गेला. सुरेश धस तु्म्ही आमदार झालात. ज्यावेळी आंतरवाली सराटीत गोळीबार झाला, पोलीस भगिणींवर विनयभंग झाला. बीड शहरात ओबींसीची घरं जाळण्यात आली. त्यावेळी गॅंग्स ऑफ बीड सुरेश धसला दिसले नव्हते का? असा सवाल देखील हाकेंनी केलाय.
ज्यावेळी बंदुकी दिल्या त्यावेळी सुरेश धस यांना दिसल्या नाही का? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केलाय. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा वापर सुरेश धस स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय.