Download App

अनैतिक संबंधांतून संतोष देशमुखांची हत्या दाखवण्याचा कट, देशमुख कुटुंबाचा पोलिसांवर खळबळजनक आरोप

Santosh Deshmukh Case : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून (Santosh Deshmukh Case)

  • Written By: Last Updated:

Santosh Deshmukh Case : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून (Santosh Deshmukh Case) राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणणात भाजप (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यासह विरोधकांनी वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यासह राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

तर दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपींना अटक केली आहे. मात्र आतापर्यंत कृष्णा अंधारे (Krishna Andhare) अद्याप फरार असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी खळबळजनक दावा केला आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणात पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

एबीपी माझाशी बोलताना, धनंजय देशमुख म्हणाले की, त्या रात्री मला फोन आला होता की, अण्णांना गाडीत घेतले आहे आणि गाडीपुढे गेली आहे. अण्णांना लागले आहे. त्यांना रुग्णालयात घेऊन जायचं आहे. अशी मला माहिती मिळाली होती परंतु ही माहिती तुमच्याकडे कशी पोहोचली नाही याचा मला आश्चर्य वाटत आहे. ही माहिती आम्ही ज्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगत होतो त्यांनी ही गोष्ट कोणालाचकडून दिली नाही कारण त्यानंतर अधिकारी बदलले गेले म्हणून ही गोष्ठ थांबली.

जी रुग्णवाहिका होती ती कळंबच्या दिशेने निघाली होती आणि त्याच्या पाठीमागे मस्साजोगमधल्या गाड्या निघाल्या. कारण संतोष देशमुख यांना कळंबच्या दिशेने का घेऊन जात आहे याचा तपास करण्यासाठी मस्साजोगमधल्या गाड्या निघाल्या होत्या अशी माहिती मला मिळाली होती. आरोपींकडून कळंबमध्ये एक महिला तयार ठेवण्यात आली होती. संतोष देशमुख यांची हत्या अनैतिक संबंधांतून झाल्याचं दाखवण्याचा कट पोलिसांचा होता मात्र आमच्या गाड्या पाठीमागे असल्याने त्याचा डाव फसला असा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे.

कर्जत, जामखेड तालुक्यातील जलसंधारण कामाला गती द्यावी; सभापती प्रा. राम शिंदे

तसेच आम्ही या प्रकरणात पहिल्या आठ दिवसाचा तपास योग्य पद्धतीने करण्यात यावा अशी मागणी करत आहोत असे देखील यावेळी धनंजय देशमुख म्हणाले. धनंजय देशमुख यांच्या या खळबळजनक आरोपांनंतर या प्रकरणात पुन्हा एकदा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

follow us