Satara District Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. उदयसिंह पाटील उंडाळकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून तर शिवसेनेचे दीपक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्य बँकेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने बाजी मारली आहे. या निवडणुकीत भाजपला धक्का देण्यासाठी राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी मोठी खेळी केली असल्याची चर्चा सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.
शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) या निवडणुकीच्यानिमित्ताने जिल्हा परिषदेतील भाजपकडून (BJP) झालेल्या पराभवाचा वचपा काढल्याचे बोलले जात आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 21 पैकी 9 संचालक भाजपचे विजयी झाले होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 आणि शिवसेनेचे 4 संचालक निवडून आले होते. जिल्हा बँक अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) घेणार असं भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी म्हटलं होतं तर स्थानिक पातळीवर चर्चा करुन अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार अशी भूमिका पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी घेतली होती. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते.
‘मान’ मधून उमटणार स्त्रीशक्तीचा सामूहिक हुंकार; 4 जूनला चित्रपट होणार प्रदर्शित
