प्रफुल्ल साळुंखे,
(विशेष प्रतिनिधी)
SC result on Maharashtra Political crises : सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल १४ मे पर्यंत येण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि उद्भव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी तशी वातावरण निर्मिती केली देखील आहे. नाना पाटोले, संजय राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्या प्रत्येक बैठकीत हे सरकार लवकर कोसळणार अशीच विधान येत आहेत.
सत्ता संघर्षाची सर्वोच्च नयायालयात सुनावणी पुर्ण झाली आहे. मात्र सत्ता संघर्षात १६ आमदारांचे निलंबन करण्याचा अधिकार कुणाचा याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पंधरा दिवसांसाठी लंडनला जात आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च नयायालयाचा निकाल सरकार विरोधात येईल का? की, तत्कालीन उपाध्यक्ष नरहाळी झिरवळ यांच्याकडे हा निर्णय जाईल का? अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान मी विदेशात जाणार असलो तरी या निकालाचा आणि दौऱ्याचा संबंध नसल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितल आहे. आमदारांचं निलंबन हा पूर्णतः निर्णय विधानसभा अध्यक्ष यांचा आहे. असं देखील त्यांनी सांगितल आहे. सरकारचा निकाल काय लागतो? याकडे पाहताना गेल्या काही दिवसात झालेली राजकिय नेत्यांची विधान यांचा गुंता अधिक वाढवताना दिसत आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक म्हणतात निकाल आमच्या बाजूने लागेल. सर्वाधिकार विधानसभा अध्यक्ष यांना मिळतील हे पाहता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहातील अस शिंदे समर्थकांना वाटते. हे सरकार कोसळणार हा डावा काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट करताना दिसतोय. या विधानाबरोबर उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापुरातले विधान आणि शरद पवार यांचे विधान सुचक संदेश देताय का? असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.
Amol Kolhe : जयंत पाटलांना भावी मुख्यमंत्री म्हणणारे कोल्हे म्हणाले, अजितदादा होते म्हणून…
“मी पुन्हा येणार, मी कसा येतो हे तुम्ही पाहिल आहे. अस विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यालाच पुष्टी जोडणारं विधान शरद पवार यांच्याकडून देखील आलं आहे. सोळा आमदार अपात्र झाले तरी हे सरकार स्थिर राहणार अस पवार म्हणाले. म्हणजेच १६ आमदार अपात्र झाले तरी राज्याचे २८८ मधील आमदारांची संख्या १६ ने कमी होऊन ती २७२ होते. म्हणजेच बहुमतासाठी १३७ आकडा हवा. भाजप आणि शिवसेना शिंदे गट तसेच अपक्ष असा एकत्रित आकडा १५o च्या वर आहे. यामुळे सरकार कोसळेल ही शक्यता धूसर आहे. सरकार जाणार नसेल तर मुख्यमंत्री कोण हा प्रश्न उपस्थित होतो.
रामराजेंना दिल्लीत पाठविणार : जयंत पाटलांकडून माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर
भाजप आणि शिंदे गटात मुख्यमंत्री पदासाठी पाहिलं नाव येत ते देवेंद्र फडणवीस यांचेच, पण पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हा मुद्दा महत्त्वाचा आहे. शिंदे हे मुख्यमंत्री पदावरुन पाय उतार झाले तर शिंदे गटात अनेक आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या नियंत्रणात आहेत. हे पाहील तर त्यांना डावलणे सोपे नाही.
जर शिंदे गटाच्या पाठिंब्या ऐवजी अजित पवार यांच्या गटाचा पाठिंबा घेतलाच तर या ठिकाणी ट्विस्ट येऊ शकतो. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री आहे. त्यामुळे दोन्ही नेते मुख्यमंत्री-उपमुखमंत्री पदाचे दावेदार असतील. पण जर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं तर राज्यात अनपेक्षितपणे नवा उपमुखमंत्री पदाचा चेहरा येईल अस चित्र आहे. हा चेहरा आशिष शेलार यांचा असेल अशी शक्यताही वर्तवली जात आहे.गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री करा हा एक पर्याय फडणवीस गटाकडून पुढे येऊ शकतो. पण त्याला मान्यता मिळेल ही शक्यता कमी आहे. तिकडे विखे पाटील यांनीही मोर्चे बांधणी सुरु केली आहे. शिंदे गटालाच पुन्हा प्राधान्य मिळालं तर दिपक केसरकर हा चेहरा देखील पुढे केला जातोय. पण त्यांना किती बळ मिळेल यात शंका आहे. निकाल काय येईल त्या आधी मुख्यमंत्री पदाची स्पर्धा मात्र तीव्र झाली आहे.