SCERT New School Timetable : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (State Council of Educational Research and Training) म्हणजेच एससीईआरटीने (SCERT) मोठा निर्णय घेत राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना एकच वेळापत्रकाची घोषणा केली आहे. यानुसार आता पहिली ते नववीच्या सरकारी आणि खाजगी शाळांना एकच वेळापत्रक असणार आहे. या वेळापत्रकानुसार, राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा एकाच वेळी आयोजित करण्यात येणार आहे.
एससीईआरटीने दिलेल्या माहितीनुसार, आता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा 8 ते 25 एप्रिल दरम्यान होणार आहे तर 1 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर 2 मे पासून शाळांना उन्हाळाच्या सुट्ट्या लागणार आहे. राज्यात शौक्षणिक वर्ष 30 एप्रिलपर्यंत सुरु असते मात्र अनेक शाळांमध्ये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात परीक्षा आयोजित करण्यात येते. त्यानंतर 30 एप्रिलपर्यंतचे शैक्षणिक दिवस वाया जातात. याबाबत विचार करुन एससीईआरटीने राज्यातील सर्व शाळांना एकच वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नवीन वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा 8 एप्रिलपासून 25 एप्रिलपर्यंत आयोजित करण्यात येणार आणि निकाल 1 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. याचबरोबर 2 मे पासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहे.
तर दुसरीकडे एससीईआरटीने घेतलेल्या या निर्णयाला मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. तसेच सूट्टयांचे नियोजन बिघडणार असल्याची प्रतिक्रिया पालकांकडून येत आहे. अचानक बदल करण्यात आल्याने शाळांचे नियोजन कोलमडणार असल्याचे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले आहे.
‘आमचा औरंगजेब सुतारवाडीत बसलाय…’, महायुतीत पुन्हा वाद? सुनील तटकरेंवर शिंदेंच्या शिवसेनेची जहरी टीका
तसेच पुढील शैक्षणिक वर्षात जून महिन्यात याची कल्पना देऊन हा निर्णय लागू करणे आवश्यक होते याबाबत आम्ही निवेदन देणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.