Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिल्याने शंभूराजे देसाई आदित्य ठाकरेंवर बरसले

सातारा : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचे चॅलेंज दिले. यावर वरळी मतदासंघात (Worli Constituency) मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देण्याआधी पाटण मतदारसंघात उभं राहुन निवडणूक लढवून दाखवा, असं आव्हान मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आदित्य ठाकरेंना दिलं. आदित्य ठाकरे यांनी उघडपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना […]

Untitled Design (74)

Aditya Thackeray

सातारा : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचे चॅलेंज दिले. यावर वरळी मतदासंघात (Worli Constituency) मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देण्याआधी पाटण मतदारसंघात उभं राहुन निवडणूक लढवून दाखवा, असं आव्हान मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आदित्य ठाकरेंना दिलं.

आदित्य ठाकरे यांनी उघडपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचे चॅलेंज दिले आहे. यामुळे शिंदे गटातील नेते जोरदार पलवार करत आहेत. स्वत:ला आमदार होण्याकरिता वरळीतल्या २ आमदारांचं तिकीट कापून विधानपरिषदेची आमदारकी द्यावी लागली. एका आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यासाठी त्यांना २ आमदारकी द्यावी लागली, ही त्यांची वस्तुस्थिती आहे आणि यांनी एकनाथ शिंदेंना चॅलेंज देणं हे हास्यास्पद आहे, असं सांगत शंभूराजे देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला.

आदित्य ठाकरे गेल्या ६ महिने काहीच बोलत नव्हते. मात्र आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलायला लागले, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चॅलेंज देत वरळीतून उभं राहण्याचं चॅलेंज दिलंय. मात्र माझं आदित्य ठाकरे यांनीच माझ्या पाटण मतदारसंघात उभं राहुन दाखवावं असं आव्हान शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना दिलं.

 

Exit mobile version