Download App

ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व गमावला; हरि नरकेंच्या निधनावर पवारांसह अनेक नेते भावूक

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar Condolence On Prof. Hari Narke Death :  मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर प्रो. हरी रामचंद्र नरके यांचे दुःखद निधन झाले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावल्याच्या भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत. याबाबत पवारांनी ट्वीट केले आहे.

हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू या प्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले. हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय ज्वलंत उदाहरणे आहेत. जसे, ओबीसींमध्ये पेरली दुहीची बीजे, फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन, मराठा आरक्षण, महात्मा फुले, समाजशोध इत्यादी. त्याप्रमाणेच त्यांची पुस्तके, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा असे अनेक पुस्तके प्रकाशित झाली.

‘मग, अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून मोदींनी रोखले का?’ PM मोदींच्या टीकेवर राऊतांचा थेट सवाल

अजित पवारांकडून श्रद्धांदली

“ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला, ओबीसी हक्कांसाठीच्या चळवळीत आघाडीवर राहून लढणारा कृतीशील कार्यकर्ता आपण गमावला आहे. ते सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक, परखड भाष्यकार होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक, संशोधक, व्याख्याते ही त्यांची ओळख होती.
तत्कालीन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलं होतं.

प्रा. हरी नरके यांनी अनेक शासकीय समित्यांवर तज्ञ सदस्य म्हणून काम केलं आहे. त्यांच्या निधनानं दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांची बाजू हिरीरीनं मांडणारं, ओबीसी चळवळीला वाहून घेतलेलं बुद्धीवादी व्यक्तिमत्वं हरपलं आहे. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा. हरी नरके यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

“ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड असा विचारवंत आपण गमावल्या भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘महाराष्ट्राच्या विचार व्यासपीठावर आपल्या अभ्यासपूर्ण आणि परखड विचारांनी प्रा. हरी नरके यांनी आपली अशी ओळख निर्माण केली. वक्तृत्वाची आगळी शैली आणि अभ्यासपूर्ण मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून रचनात्मक काम केले. त्यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळ आणि राज्यातील अभ्यास – संशोधनात्मक लेखन प्रवाहाची हानी झाल्याच्या भावना शिंदे यांनी व्यक्त करत नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

‘मग, अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून मोदींनी रोखले का?’ PM मोदींच्या टीकेवर राऊतांचा थेट सवाल

महात्मा फुले यांच्या साहित्याचा आणि विचारांचा अभ्यासक गमावला – फडणवीस

नरके यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की, ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्राने महात्मा फुले यांच्या साहित्याचा आणि विचारांचा अभ्यासक गमावला आहे. प्रा. हरी नरके यांनी आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून नेहमी महात्मा फुले यांचे विचार मांडले. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला आहे.

एका विचारवंताला महाराष्ट्र मुकला – वर्षा गायकवाड

प्रा. हरी नरके यांच्या निधनाने एका विचारवंताला महाराष्ट्र मुकल्याच्या भावना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केल्या आहेत.  लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं कार्य आणि विचार याचा त्यांनी प्रचार प्रसार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं अप्रकाशित साहित्य, पत्रकारितेचे खंड त्यांच्यामुळेच प्रकाशित झाले. फुले, आंबेडकर आणि समतावादी विचारांसाठी गेली चार दशकं ते महाराष्ट्र आणि देशभर हिंडले. महापुरूषांची बदनामी करणाऱ्या विकृत प्रवृत्तीच्या विरूद्ध ते सडेतोड युक्तीवाद करत एका योद्ध्यासारखे लढले. प्रा. नरके यांच्या निधनाने समतावादी चळवळीची हानी झाली असून, त्यांच्या स्मृतिला विनम्र अभिवादन !

पुरोगामी चळवळीचे एक प्रमुख शिलेदार काळाच्या पडद्याआड – अशोक चव्हाण

ज्येष्ठ लेखक आणि सुविख्यात विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळीचे एक प्रमुख शिलेदार काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेसाठी समर्पित होते. ते नेहमी स्मरणात राहतील. प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Tags

follow us