महायुतीत शरद पवार गटाची ग्रँड ‘एंट्री’ होणार?; पाटील–तावडेंची पडद्यामागे खलबतं

'ऑपरेशन टायगर'च्या धुरळ्याची चर्चा शमते न शमते तोच, मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधील तावडे-पाटील भेटीने खळबळ उडवून दिली आहे.

Mahayuti

Mahayuti

Sharad Pawar NCP May Join Hands With BJP Mahayuti : राज्याच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा भूकंपाच्या हालचालींना वेग आला आहे ‘ऑपरेशन टायगर’च्या धुरळ्याची चर्चा शमते न शमते तोच, मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तावडे आणि जयंत पाटील यांची भेट झाल्याने शरद पवारांच्या पक्षाची महायुतीतत ग्रँड एन्ट्री होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.  विनोद तावडे आणि शरदचंद्र पवार पक्षाचे चाणक्य मानले जाणारे जयंत पाटील यांची ही भेट म्हणजे केवळ योगायोग की महायुतीच्या दिशेने पडलेले पुढचे पाऊल? या प्रश्नाने राजकीय वर्तुळात चर्चेचा धुरळा पुन्हा एकदा उडाला आहे

तावडे-पाटील बैठकीत नेकमी चर्चा काय?

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने महायुतीत सहभागी झाल्यास त्याची संभाव्य राजकीय भूमिका, सत्तेतील सहभाग आणि भविष्यातील समीकरणांवर प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. या चर्चेनंतर जयंत पाटील यांनी पक्षातील एका वरिष्ठ नेत्यासोबत स्वतंत्र बैठक घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे या भेटीला केवळ ‘औपचारिक’ किंवा ‘सौजन्यपूर्ण’ भेट म्हणून पाहिले जात नाही. जयंत पाटील यांनी विनोद तावडे यांच्याशी भेट झाल्याचे मान्य केले आहे. मात्र, बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून केवळ अनौपचारिक संवाद झाल्याचे त्यांनी सांगितले. तरीही या स्पष्टीकरणामुळे राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळालेला नाही.

महायुतीत नवे समीकरण?

राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत शरद पवार गटाची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कराण लोकसभा निवडणुकीत उल्लेखनीय यश मिळवल्यानंतर या पक्षाकडे 10 आमदार आणि 8 खासदारांचे संख्याबळ आहे.

अजित पवारांनंतर बदलले राजकीय चित्र

अजित पवार हयात असताना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा अनेकदा रंगली होती. मात्र त्यांच्या निधनानंतर ती शक्यता मागे पडली. आता मात्र शरद पवार गटाने स्वतंत्रपणे महायुतीशी संवाद सुरू केल्याच्या चर्चेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चर्चांना उधाण, अधिकृत भूमिका अद्याप गुलदस्त्यात

जयंत पाटील–विनोद तावडे भेटीनंतर राजकीय तर्क-वितर्कांना वेग आला असला, तरी या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे शरद पवार गट महायुतीच्या दिशेने पाऊल टाकणार की ही केवळ राजकीय शिष्टाचाराची भेट होती, याचे उत्तर येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे NDA सोबत सत्तेत सहभागी होणार या चर्चा तथ्यहीन असून, विरोधक म्हणून काम करणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Exit mobile version