Sharad Pawar On Action Mode : पक्षात तरुणांना सक्रिय करायचे असेल तर त्याना पक्षात विविध पद दिली गेली पाहिजे. आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. अशा शब्दात शरद पवार यांनी पक्षात होऊ घातलेले बदल याचे संकेत दिले आहेत. चेंबूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युथ मेळाव्यात पवार बोलत होते.
पवार म्हणाले तरुणांना संधी दिली गेली पाहिजे. तरुणांना पक्षात घ्यावे असे मी नेत्यांना सांगेल. जे लोक संघटनेत काम करतात त्यांना सांगण आहे की पाच ते सहा वर्ष युवक चळवळीत काम करणाऱ्यांना संघटनेत घ्या. याठिकाणी त्यांनी काम प्रस्तावित केलं तर त्यांना महापालिकेसाठी संधी द्या. अशा सूचना आपण परदेशाध्यक्ष यांना करणार असल्याचे पवार यांनी सांगितल.
मला पिढीचंच आश्चर्य वाटतं… राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण
गेल्या काही दिवसात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस मधले अनेक आमदार पक्ष सोडतील अशी चर्चा सुरु आहे. या चर्चांचे अजित पवार आणि शरद पवार यांनी खंडण केले आहे. या वादावर पडदा टाकल्लाचे सांगितले. पण पवार जेंव्हा भाकरी फिरवण्याचे संकेत देतात. तेंव्हा काहीची गच्छंती ठरलेली असते अशा अनेक आठवणी आहेत. हे पाहता पवार यांचं भाकरी चे उदाहरण पक्षातील वरिष्ठ नेत्याना संकेत तर नाही ना? अशी चर्चा रंगली आहे.