Sharad Pawar on Minister Radhakrishan Vikhe Patil for Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) हे पुन्हा आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. हे निर्णायक उपोषण असेल जर मागण्या मान्य झाल्यास मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी शरद पवारांवर 1994 ला पाप केलं म्हणत मराठा आरक्षणावरून टीका केली होती. त्यावर आता शरद पवारांनी विखेंना प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
1994 ला पाप झालं म्हणणारे 1994 पासून तब्बल 25-26 वर्षांपासून सत्तेत आहेत. त्यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी काय केलं? असं म्हणत शरद पवारांनी विखेंना प्रत्युत्तर दिले आहे.
विखे पाटील नेमकं काय म्हणाले?
मी नेहमी सांगतो की, 1994 ला जेव्हा मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या तेव्हा त्यात तत्कालीन मुख्यमंत्री जे कोण होते. त्यांनी त्यात मराठा समाजाचा अंतर्भाव केला असता. तर हे आज घडलं नसतं. या पापाचे वाटेकरी कोण आहेत. हे सगळंविसरून मराठा समाजाला देवेंद्रजींनी निर्णय घेतला आहे. ते 16 टक्के आरक्षण दिलं जे मविआ सरकारला टिकवता आलेलं नाही. अशी टीका विखे यांनी केली होती.
