Sharad pawar : पतंगराव कदमांचे (Patangrao Kadam) शैक्षणिक क्षेत्रातील कार्य मोठे होते. त्यांनी तळागाळातील विद्यार्थ्यांना भारती विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण मिळेल, याची खबरदारी घेतली. त्यांनी कर्मवीरांचा विचार सोडला नाही. त्यांनी कर्मवीरांच्या विचारांची बांधिकली शेवटपर्यंत जपली, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार (Sharad pawar) पक्षाचे नेते शरद पवार यांनी काढले. विश्वजीत कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. ते आज सांगलीत बोलत होते.
Government Schemes : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका अनुदान योजनेचा आहे तरी काय?
सांगलीच्या पलूस-कडेगावमध्ये आज माजी मंत्री स्व. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यासह अनेक पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलतांना सभेला संबोधित करतांना पवार म्हणाले, सातारा आणि सांगली जिल्ह्याने महाराष्ट्राचा इतिहास घडवला. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, क्रांतीसिंह नाना पाटील, राजाराम बापू पाटील या नेत्यांचं महाराष्ट्रासाठी मोठं योगदान आहे. स्वातंत्र्याचा अर्थ नव्या पिढीच्या अंतकरणात उतरावा यासाठी कर्मवारी भाऊरांव पाटलांसह अन्य लोकांनी सामान्य लोकांच्या शिक्षणासाठी आपलं अख्खं आयुष्य खर्ची घातलं. कर्मवीरांचा काम पंतगराव कदमांनी पुढं नेलं. कर्मवीरांचा आदर्श ठेऊन त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली, असं पवार म्हणाले.
मोठी बातमी! रशिया तत्काळ युद्ध थांबवण्यास तयार; युक्रेनसमोर ठेवल्या ‘या’ दोन अटी
पवार म्हणाले, पतंगरावांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य मोठे होते. त्यांनी तळागाळातील विद्यार्थ्यांना भारती विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण मिळेल, याची खबरदारी घेतली. त्यांनी कर्मवीरांचा विचार सोडला नाही. त्यांनी कर्मवीरांच्या विचारांची बांधिकली जपली. ते एक मोठे नेते होते. आज त्यांच्या गैरहजेरीत विश्वजीत कदम त्यांची परंपरा अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत, असं पवार म्हणाले.
सांगली हा एकेकाळी दुष्काळी भाग होता. या भागातील शेतकऱ्यांच्या संसाराला फुलवायचे असेल तर पाण्याची गरज होती. ती पाण्याची गरज भागवण्याचे काम पतंगराव कदम यांनी केले, असं पवार म्हणाले. यावेळी त्यांनी विश्वजीत कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाहीही दिली.
सत्ताधारी जातिव्यवस्थेला खतपाणी घालतात – राहुल गांधी
तर पतंगराव कदम यांनी आपले संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र आणि देशासाठी समर्पित केले. इंदिरा गांधींच्या पराभवानंतरही ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आज भारतात विचारधारांची लढाई सुरू आहे. एका बाजूला काँग्रेस आणि सर्व महापुरुष आहेत. तर दुसऱ्या बाजूला भाजप आहे. आम्हाला सामाजिक प्रगती हवी आहे. सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायचे आहे. परंतु सत्ताधाऱ्यांना निवडक लोकांना पुढे न्यायचे आहे, ते जातिव्यवस्थेला खतपाणी घालण्याचे काम करतात. ते द्वेष, हिंसाचार घडवतात. ते जाती-जातीतं भांडण लावतात, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.