आठ-दहा दिवस वाट पाहू मग… शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीवर शरद पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar यांना शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षावर विचारलं असता त्यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली.

Sharad Pawar (2)

Sharad Pawar (2)

Sharad Pawar on Shivsena Party and Symbol case hearing : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून (Shiv Sena Name and Symbol Case) सुरू असलेल्या ठाकरे आणि शिंदे गटातील कायदेशीर संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (2 सप्टेंबर) पुन्हा सुनावणी झाली. शिंदे गटाकडून युक्तिवाद केला गेला. यावर आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीमध्ये काय होईल हे मी सांगू शकत नाही? शेवटी निकाल कोर्टाचा आहे. अद्या सुनावणी संपलेली नाही. त्यावर अगोदरच आपण असं भाष्य करू शकत नाही. यावर आणखी आठ-दहा दिवस वाट पाहू मग काय होईल त्यावर चर्चा करणे योग्य ठरेल. असं म्हणत पवारांनी या सुनावणीवर थेट काही बोलणं टाळलं आहे.

मराठा आंदोलकाचा अंतरवाली सराटीत मृत्यू; नेमकं काय घडलं!

दरम्यान शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या वादात निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय योग्य असून, अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असा जोरदार युक्तिवाद एकनाथ शिंदे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी न्यायालयात केला. बाळासाहेब ठाकरे हयात असतानाही निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारांचा वापर केला होता आणि ते अधिकार बाळासाहेब ठाकरे यांनीही मान्य केले होते, असा दावा कौल यांनी सुनावणीदरम्यान केला.

Exit mobile version