कर्नाटक निकालानंतर निवडणुका लांबणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवार यांनी आज पुण्यातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील इतर घडामोडींवरही भाष्य केलं आहे.
अजित पवारांचं विधान पृथ्वीराज चव्हाणांनी केलं मान्य, म्हणाले…
दरम्यान, कर्नाटक निकालानंतर राज्यातही आता निवडणुकीचं वार वाहु लागलं आहे. कधीही निवडणुका लागू शकतात त्यामुळेच महाविकास आघाडीकडून बैठकांचं सत्र सुरु होतं. या बैठकीनंतर राज्यात लवकरच निवडणुका लागणार असल्याचं राजकीय घडामोडींवरुन दिसून येत होतं. एवढंच नाहीतर जागावाटपावरही महाविकास आघाडीचे नेते दावा करत असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यावर आता शरद पवारांनी मोठं भाकीत केल्याने राजकीर वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Diana In Cannes : चर्चा तर होणारच! कान्स फेस्टिव्हलमध्ये डायना पेंटीचा बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ
शरद पवार म्हणाले, राज्यात निवडणुकी कधी लागतील हे मी स्पष्टपणे सांगू शकत नाही पण नोटबंदी आणि कर्नाटकाच्या निकालामुळे निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय.
PHOTO : पांढऱ्या टॉप-ब्लॅक पॅन्टमध्ये विमानतळावर दिसली अनुष्का शर्मा
यावेळी बोलताना शरद पवार यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागली आहे. ते म्हणाले, चुकीचे काम करणाऱ्यांना सरकारडून संरक्षण दिलं जात आहे अन् ज्यांचा काही संबंध नाही त्यांना त्रास देण्याच काम सुरु असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव केला आहे. कर्नाटकमधील काँग्रेसच्या या विजयानंतर इतर राज्यातील विरोधी पक्षांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपाविरोधी पक्षांना एकत्र करून राजकीय समीकरणं आखली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही राजकीय हालचालींना वेग आला आहे.