लाचारांची स्वारी सिल्व्हर ओकच्या दारी…हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा खाली मान घालून पवारांच्या घरी गेला, या शब्दांत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी शरद पवार-उद्धव ठाकरे भेटीवर खोचक टीका केलीय. दरम्यान, काल उद्धव ठाकरे शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावर भेटीसाठी गेले होते. त्यावरुन विरोधकांकडून टीकेचा सूर लावण्यात येत आहे.
लाचारांची स्वारी सिल्व्हर ओक च्या दारी…
आडनावाचा वारसा आला पण स्वाभिमानाचा वारसा नाही आला… कधीही कुणाच्या दारी न गेलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा खाली मान घालून पवारांच्या घरी गेला…
पक्ष गेले, चिन्ह गेले…आणि आता स्वाभिमानही गेला… pic.twitter.com/AOP5HW5nSQ— sheetal mhatre (@sheetalmhatre1) April 11, 2023
ट्विटमध्ये म्हात्रे म्हणाल्या, “आडनावाचा वारसा आला पण स्वाभिमानाचा वारसा नाही आला…कधीही कुणाच्या दारी न गेलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा खाली मान घालून पवारांच्या घरी गेला… पक्ष गेले, चिन्ह गेले…आणि आता स्वाभिमानही गेला” अशी टीका म्हात्रे यांनी केलीय.
एक नाव आणि चिन्ह नसलेला पक्ष, नुकताच प्रादेशिक झालेल्या दुसऱ्या पक्षाचे सात्वंन करण्यास गेला… आघाडी मध्ये बिघाडी झाल्याची चर्चा??? All is NOT well???? pic.twitter.com/62lSOmWU8O
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) April 11, 2023
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याबाबत कोणत्याही नेत्यांना विचारात घेतलं नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी वक्तव्य केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
‘या’ नेत्याच्या हट्टापायी पुणे मनपातून गावं वगळली; केसकरांचा आरोप
तर दुसरीकडे पवारांनी वक्तव्य करताच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर दाखल झाले. यावेळी त्यांनी शरद पवारांची भेट घेत चर्चा केली आहे.
दरम्यान, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीची बातमी समोर येताच सत्ताधाऱ्यांकडून टीकेची तोफ उठली. त्यावरुन आता एक पक्ष दुसऱ्या पक्षाच्या सांत्वनासाठी गेल्याचं म्हात्रेंनी म्हंटलंय.