मुंबई : शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्या बदनामीकारक व्हिडीओ बद्दल राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत राज्याच्या गृहविभागाकडे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, राज्यात महिला लोकप्रतिनिधींना सोशल मीडियावरून ट्रोल करण्याचे प्रकार वाढत आहेत. जर लोकप्रतिनिधींबाबत असे प्रकार होत असतील तर राज्यात महिला सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महिलांना सायबर सुरक्षा देणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकरणांमध्ये सायबर विभागाने गांभीर्याने आणि तातडीने कारवाई करावी. शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओ प्रकरणी गृह विभागाने योग्य ती कारवाई तात्काळ करावी. तसेच सत्य जनतेला सांगावे.
Ajit Pawar यांनी सरकारची फसवेगिरी आणली चव्हाट्यावर : मुद्दा क्रमांक १२६ अन् १६५ बद्दल काय बोलले?
दरम्यान, एकनाथ शिंदे गटाचे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणाची चौकशी करावी. या मागणीसाठी स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवत चौकशीची मागणी केली आहे.
शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे यांच्या बदनामीचा कट करणाऱ्या आणि आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या फेसबुक खाते धारकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दोषी आढळलेल्या आरोपीवर न्यायालयीन प्रक्रिया राबवून भारतीय दंड सहिंता कलम ३५४, ४७१, ५०९, ४९९, ५०० अंतर्गत योग्य ती कारवाई करण्यासाठी स्वारगेट पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे, असे प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले.