राजळेंच्या त्या कुरघोडीचा काकडेंनी वचपा काढला… शेवगावात सेनेचा भगवा फडकला

Shevgaon Municiples मध्ये राजळेंच्या उमेदवाराचा पराभव तर अरुण मुंडेंच्या पत्नीचा विजय झाला यातून काकडेंनी मोलाची भूमिका बजावल्याचं बोललं जातय

Shevgaon Municiples

Shevgaon Municiples

Shevgaon Municiples Harshda Kakade take revenge of BJP MLA Monika Rajale : अहिल्यानगरच्या शेवगाव नगरपरिषदेमध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. भाजपने उमेदवारी नाकारलेले अरुण मुंडे यांच्या पत्नी माया मुंडे यांनी शिवधनुष्य हाती घेत विजयाचा गुलाल उधळत नगराध्यक्ष झाल्या. मात्र हे सगळं होत असताना या निवडणुकीतील विजयाचे शिल्पकारकिंगमेकर म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या हर्षदा काकडे यांनी भूमिका बजावली. विधानसभेच्या एका दगा फटक्याचा बदला काकडे यांनी आमदार राजळे यांच्या उमेदवाराचा पराभव करून घेतला . राजळेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची ताकद असताना शिवसेनेचा भगवा फडकवण्यात काकडे यांनी मोलाची भूमिका बजावली असल्याचे बोलले जात आहे.

उमेदवारी नाकारलीमुंडेंनी राजळेंना पराभवाची धुळ चाखवली

आ. मोनिका राजळे यांच्या विधानसभा मतदारसंघातील शेवगाव पालिकेतील पराभव म्हणजे एक प्रकारे आगामी राजकीय संघर्षाची नांदीही ठरणारा असाच आहे. भाजपांतर्गत वादातून प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या पत्नीला राजळे यांनी उमेदवारी नाकारली. आपल्या जवळच्या कार्यकर्ता असलेल्या महेश फलके यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. मात्र उमेदवारी नाकारण्यात आल्याने मुंडे यांनी खचूनजाता आमदार राजळेंच्या विरोधातच शडू ठोकला.

‘मायसा’चा फर्स्ट ग्लिम्प्स 24 डिसेंबरला रिलीज होणार; रश्मिका मंधानाच्या नव्या पोस्टरमुळे उत्सुकता शिगेला

मुंडे यांनी ऐन वेळी शिंदे सेनेचा बाण हाती घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवत अरुण मुंडे यांनी पत्नी माया मुंडे यांच्या रूपाने शेवगावात पहिल्यादांच भगवा फडकावला. मुंडे यांच्या विजयाने आगामी काळातील राजकीय गणित बदलणार असे चित्र आता मतदार संघात निर्माण झाले आहे.

शिवसेनेला मिळाली जनशक्तीची साथभाजपचा सुपडासाफ

शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनाकाकडे यांची जनशक्ती पार्टी या एकत्र आल्या. मुंडे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार सभा घेतली . यावेळी काकडे यांनी देखील आपला पक्षशिवसेना मिळून प्रस्थापितांना बाजूला सारत नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवला जाईल यासाठी मैदानात उतरल्या. व अखेर शिवसेनेच्या माया मुंडे या नगराध्यक्ष झाल्या.

काकडेंनी वचपा काढला

२०१४ च्या शेवगाव पाथर्डी विधानसभा निवडणुकीचे तिकीट हे हर्षदा काकडे यांना मिळणार हे जवळपास निश्चित झाले मात्र ऐनवेळी मोनिका राजळे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र काकडे यांनी झालेली गोष्ट स्वीकारत राजळे यांचं काम करत त्यांना विजयी केले मात्र २०१७ ला जिल्हा परिषदेची उमेदवारी काकडे यांना राजळे यांनी नाकारली. यामुळे झालेल्या दगाफटकामिळालेली अन्यायाची वागणूक याचा बदला हर्षदा काकडे यांनी शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत घेतला. शिवसेनाला आपल्या जनशक्ती पक्षाची जोड देत मुंडे यांच्या विजयात किंगमेकर म्हणून काकडे या अधोरेखित झाल्या.

एकनिष्ठांना डावलणे राजळेंना महागात पडले

गेली अनेक वर्षे भाजपात असलेलेपक्षाची एकनिष्ठ असलेले अरुण मुंडे यांच्या पत्नीला भाजपकडू उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती . मात्र पक्षांतर्गत असलेल्या वादामुळे आमदार राजले यांचा मुंडे यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे बोलले जात होते. मात्र हीच चूक राजळे यांना भारी पडली . लोकप्रतिनिधी यांच्या उमेदवारला जनतेने स्पष्ट नाकारणे ही आमदार मोनिका राजळे यांच्यासाठी आगामी राजकीय वाटचालीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे

Exit mobile version