Download App

Shinde-Fadanvis Govt : भुजबळ-महाजन यांचा दुसऱ्यांदा एकत्र विमानप्रवास… राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!

मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत सलग दोन दिवस विमानातून एकत्र प्रवासामुळे राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शनिवारी (दि. १७) रोजी पहिल्यांदा गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांनी एकत्र विमान प्रवास केला होता. तर रविवारी (दि.१८) रोजी दुसऱ्यांदा नांदेड ते मुंबई असा महाजन-भुजबळ एकत्र प्रवास करण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

एकीकडे राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे भवितव्य काही दिवसांचेच राहिले असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्षाची सर्व सुनावणी पार पडली असून आता फक्त निकालाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे जर सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात निकाल दिला आणि एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना जर अपात्र ठरवले गेले तर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळू शकते. अशा परिस्थितीत भाजपचे सरकार आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतली जाऊ शकते. त्यामुळे गिरीश महाजन यांचा सलग दोन दिवस छगन भुजबळ यांच्या बरोबर एकत्र प्रवास होत आहे. याकडे राजकीय वर्तुळात गांभीर्याने पाहिले जात आहे.

Dilip Walse Patil : आमदारांच्या हालचाली जाणवतात… लवकरच सरकार कोसळणार ?

या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे. आता निकालाची प्रतीक्षा असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जर कोसळले तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार की पुन्हा राज्यात नवीन समीकरण पाहायला मिळणार आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असल्याने राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष वेधले जात आहे.

Tags

follow us