ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे या शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आज सकाळपासून सुरू होत्या. अखेर मनिषा कायंदे यांनी आज शिवसेनेत (शिंदे गट) अधिकृत प्रवेश केला आहे. ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये त्यांचा शिवसेनेत जाहिर पक्ष प्रवेश झाला. मनिषा कायंदे यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले आपली कुवत मर्यादा पाहून लोकांनी टीका करावी, बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्यावर टीका करतात, मोदी आणि अमित शहा यांचा टिकेवरून शिंदेनी ठाकरेंना सुनावले.(Shinde’s reply to Uddhav Thackeray’s criticism)
कायम तेच – तेच बोलायचे यांच्याकडे दुसरं काही बोलायला नाही. यामुळे लोकांवर काही परिणाम होत नाही थोडं बदल पाहिजे लोक हुशार झाली आहेत. असे देखील यावेळी शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते…
सरकारला मस्ती दाखवायची असेल तर मणिपुरमध्ये (Manipur Violence) दाखवा. मणिपूर जळत असताना मोदी मात्र अमेरिकेला निघाले आहेत. पण मणिपूरमध्ये जायला तयार नाहीत. विश्वगुरू अमेरिकेत जाऊन विकत घेतलेल्या लोकांसमोर ज्ञान पाजळणार. पण मणिपूर हे माझ्या देशातील एक राज्य आहे. रशिया-युक्रेनचं युद्ध तुम्ही थांबवलंत ही भाकड कथा सांगितलीत. ही भाकड कथा सत्य करायची असेल तर मणिपूर शांत करून दाखवा. जायचंच असेल तर आधी मोदींनी मणिपुरात जाऊन दाखवावं. आम्हीही पाहू की लोक त्यांचे ऐकतात का. त्यासाठी मनात आग पेटायला पाहिजे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना दिले होते.
‘मोदींनी मणिपूरमध्ये जाऊनच दाखवावं’; अमेरिकेला निघालेल्या मोदींना उद्धव ठाकरेंचे चॅलेंज!
आज सगळी लुटालूट सुरू आहे. मुंबई तर ते तोडूच शकत नाहीत. म्हणून ते काय करत आहेत तर मुंबईचे महत्व कमी करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी आम्ही मुंबईचं महत्व कमी होऊ देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला होता.