Shivaji Maharaj Statue : ठाकरे गट अन् राणे समर्थक आमने-सामने; राजकोट किल्ल्यावर मोठा राडा

सिंदुधुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ह्यावर शिवाजी महाराज पुतळला पडला, त्या ठिकाणी आज ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाला.

मोठी बातमी! मालवण राड्या प्रकरणी ४२ जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांची कारवाई

मोठी बातमी! मालवण राड्या प्रकरणी ४२ जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांची कारवाई

Thackeray vs Rane In Malwan : मालवनमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे राज्यात संतापाची लाट आहे. तसंच, सर्वपक्षीय नेते दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत आहेत. येथे आज राणे समर्थक आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं. (Shivaji Maharaj Statue) राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी आज आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते पोहचले होते. त्याचवेळी स्थानिक खासदार आणि भाजपा नेते नारायण राणे हे त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोहोचले होते. यादरम्यान, दोन्ही गट किल्ल्यामध्ये आमने सामने आले आणि वादाची ठिकणी पडली.

महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला; इव्हेंटजीवी सरकार आहे, शिवरायांच्या पुतळ्यावरून जयंत पाटालांची टीका

राजकोट किल्ल्यामध्ये ठाकरे गट आणि राणे समर्थक आमने सामने आल्यानंतर पोलिसांकडून दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र दोन्हीकडचे कार्यकर्ते पोलीस यंत्रणेला न जुमानता एकमेकांवर धावून गेले. यावेळी काही कार्यकर्त्यांना मारहाण झाली. तसंच, किल्ल्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असताना भाजपा नेते निलेश राणे यांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमकही झाली. तर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दमदाटी केल्याचं पाहायला मिळालं.

राजकोट किल्ल्यावर राणेंकडून ठेचून मारण्याची भाषा; सुप्रिया सुळेंनी थेट भरला सज्जड दम

आदित्य ठाकरे पोहचले

राजकोट किल्ल्यामध्ये भेट देत असताना भाजपा नेते नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट झाली होती. तसेच दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलनही केले होते. त्यानंतर नारायण राणे गडावर पाहणीसाठी पोहोचले. मात्र, काही वेळात आदित्य ठाकरे यांचंही राजकोट किल्ल्याच्या परिसरात आगमन झालं. त्यानंतर राणे समर्थक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू झाली. तर आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्यात प्रवेश देणार नाही, अशी भूमिका घेतली. तर १५ मिनिटांत वाट मोकळी केली नाही तर आम्ही किल्ल्यात घुसू, असा इशारा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिला. त्यामुळे वातावरण तापलं.

 

Exit mobile version