Download App

Shivaji Maharaj Statue : माझा अन् पुतळ्याचा काहीही संबंध नाही; चेतन पाटलांनी झटकले हात

या चबुतऱ्यावर 11 टन वजन असेल, असे मला सांगण्यात आले होते असे पाटील यांनी म्हटले आहे.

  • Written By: Last Updated:

मुंबई : मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर (Shivaji Maharaj Statue) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये स्ट्रक्चरल कंन्सल्टंट चेतन पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता या सर्व घडामोडीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. माझा आणि पुतळ्याचा काहीही संबंध नसल्याचे म्हणत हात झटकले आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी फोनवरून बोलताना पाटील यांनी अनेक गोष्टांची खुलासा केला आहे. (Chetan Patil On Malvan Shivaji Maharaj Statue)

..तर मग सगळंच संपेल; पुतळा उभारणाऱ्या त्या तरुणाला कोणती भीती?

पुतळ्याच्या कामाशी माझा संबंध नाही

चेतन पाटील म्हणाले की, राजकोट येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाशी माझा संबंध नसून, माझ्याकडे कोणतीही वर्क ऑर्डर किंवा पत्र नाही. मी नौदलाला केवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचे डिझाईन तयार करुन दिले होते. या चबुतऱ्यावर 11 टन वजन असेल, असे मला सांगण्यात आले होते असे पाटील यांनी म्हटले आहे. मी नौदलाला चबुतऱ्याचे डिझाईन तयार करुन दिले. याशिवाय, शिवरायांच्या पुतळ्याशी संबंधित अन्य कोणतेही काम माझ्याकडे नव्हते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम ठाण्यातील एका कंपनीला देण्यात आल्याचेही चेतन पाटील यांनी म्हटले आहे.

Shivaji Maharaj Statue: ‘ही मिंध्यांनी पोसलेली अफजलखानाची अवलाद’; राऊतांचा केसरकरांवर प्रहार

तेव्हा सर्व पुरावे सादर करणार

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कंन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून जयदीप आपटे आणि चेतन पाटील हे दोघेही फरार आहेत. त्यानंतर आता चेतन पाटील यांनी त्यांची बाजू मांडली असून, पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात माझे नाव असले तरी, पुतळ्याच्या कामाशी माझा संबंध नसल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. तसेच ज्यावेळी पुरावे सादर करायची वेळ येईल, तेव्हा मी सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर करेल, असे चेतन पाटील यांनी म्हटले आहे.

follow us