Download App

Shivsena : धनुष्यबाण गेला, मशालही जाणार? उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढले!

  • Written By: Last Updated:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड करून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जोरदार धक्का दिला. त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडूनही ठाकरेंना जोरदार झटके बसत आहेत. आधी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर पहिला झटका बसला.

त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचं टेन्शन पुन्हा वाढलं आहे. कारण सध्या उद्धव ठाकरे गटाकडे असलेल्या मशाल चिन्हावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. समता पक्षाकडून निवडणूक आयोगाला तसे पत्र लिहले आहे.

हेही वाचा : उद्धवजी धनुष्यबाण जाऊ द्या… जगनमोहन रेड्डी कडे बघा आणि लढा!

मशाल चिन्हावर दावा करत समता पार्टीचं निवडणूक आयोगाला पत्र लिहून त्यात म्हटलं आहे की, “ठाकरे गटाचा पक्ष आणि चिन्ह अद्याप Recognise नाही. शिवाय मशाल चिन्ह समता पार्टीकडे आहे. त्यामुळे मशाल ठाकरेंना देता येणार नाही.” समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी निवडणूक आयोगाकडे ही मागणी केली आहे.

समता पक्षाच्या मागणीवर निवडणूक आयोग काय निर्णय घेत हे पाहणे देखील महत्वाचे आहे. पण समता पक्षाचं या मागणीमुळे उद्धव ठाकरे यांचं टेन्शन पुन्हा वाढल आहे असं म्हणता येईल.

Tags

follow us