Shivsena EX MLA Shahaji Bapu Patil Meet to Manoj Jaranage in Jalana Aantarvali : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाला बसलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. त्यात आज मंगळवारी 1 सप्टेंबरला त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यानंतर शिवसेनेचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी जरांगेंच्या भेटीला गेले होते. जरांगेंची प्रकृती पाहून शहाजी बापू पाटील यांचे डोळे पाणावले होते. तसेच त्यावेळी त्यांनी तेथून थेट मंत्री शंभूराज देसाई यांना फोन केला.
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा आवडता हिंदुत्ववादी नेता कोण?
या फोनवर शहाजी बापू पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना सांगितले की आता त्याच्या तबेती कडे पहावले जात नाही. तसेच त्यांनी आंतरवालीतील परिस्थिती देसाई यांना सांगितली. त्यानंतर त्यांना उपस्थितांना बोलताना म्हटलं की, संपूर्ण महाराष्ट्रच लक्ष अंतरवलीकडे लागले आहे. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की शिंदे साहेब प्रामाणिक काम करत आहे. मनोज जरांगे पाटील यांचे प्रामाणिक आंदोलन आहे आणि पांडुरंग आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा हीच एक विनंती. जे कोणी आमचे कुणबी दाखल अडवत आहे त्यांना सद्बुद्धी द्या. असं म्हणत शहाजी बापू पाटील यांनी संबोधित केलं.
दक्षिण नगर दुष्काळमुक्त होणार… कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी मोठी आर्थिक तरतूद
