Anil Parab Dapoli Sai Resort : दापोलीमधील (Dapoli)साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या ईडीच्या (ED)आरोपपत्रातून आरोपी म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group)आमदार अनिल परब (Anil Parab)यांचं नाव वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अनिल परब यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. ईडीने आणि विरोधकांनी अनिल परब यांच्यावर बेकायदेशीर बांधकाम (Illegal construction) केल्याचा आरोप करण्यात आला होता, मात्र जसे आरोप करण्यात आले होते, त्याप्रमाणे आता तपासामध्ये अनिल परब यांचा सहभाग नसल्याचे दिसत आहे, त्यामुळे परब यांच्याविरोधात काही पुरावे सापडले नाहीत का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुस्लिम आरक्षणाच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन कोर्टाने अमित शहांना फटकारले, ”तुम्ही असं कसं बोलू शकता?”
या प्रकरणाचा अद्याप तपास सुरु असल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये जयराम देशपांडे (Jairam Deshpande)आणि सदानंद कदम (Sadananda Kadam)हे ईडीच्या अटकेत आहेत. दुसरीकडे सुधीर शांताराम परदुले (Sudhir Shantaram Pardule), विनोद दिपोलकर(Vinod Dipolkar), सुरेश तुपे, अनंत कोळी आदींच्या नावांचाही आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालायाकडून 12 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे.
ईडीने नुकतेच दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणात आरोपपत्र दाखल केले. त्यात उद्योजक सदानंद कदम दापोलीचे उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे आणि इतर चार जणांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र आरोपपत्रात माजी मंत्री व ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या नावाचा उल्लेख नसल्याचे पाहायला मिळाले आहे.
त्याचवेळी आमचा तपास सुरु असून या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करु शकतो, अशीही माहिती ईडीकडून मिळाल्याचं समजतंय.
मार्च महिन्यात न्यायालयात झालेल्या एका सुनावणीदरम्यान ईडीने सदानंद कदम यांची कोठडी मागितली होती. साई रिसॉर्टच्या बांधकामात सीआरझेड नियमांचं उल्लंघन झालं आणि हे रिसॉर्ट अनिल परब यांनी सदानंद कदम यांना विकले होते, असा दावा त्यावेळी ईडीने केला होता.