Uday Samant On Ajit Pawar : शिवसेनेचे नेते व मंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी संजय राऊतांवरदेखील भाष्य केले व श्रीकांत शिंदे व भाजप यांच्यात डोंबिवली येथे सुरु असलेल्या वादावरदेखील त्यांनी थेट भाष्य केले. तसेच त्यांनी राष्ट्रवादीच्या नवीन कार्याध्यक्ष निवडीनंतर अजितदादा नाराज आहेत का यावर देखील भाष्य केले.
महाविकास आघाडीमध्ये सर्व अलबेल नाही, हे मी अनेक वेळा सांगितलेले आहे. तसेच महाविकास आघाडीतील अनेक लोक एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेबांच्या संपर्कात आहेत, याची प्रचिती लवकरच येईल. या राजकीय घडामोडीचा त्याच्याशी काही संबंध नाही. ते पूर्वी पासूनच संपर्कात आहेत. एक मात्र नक्की महाविकास आघाडीची वज्रमूठ फक्त लोकांना दाखवण्यापुर्तीच आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांनी सल्ला दिलेला आहे कि राष्ट्रवादीवर विस्वास ठेवू नये, हा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काहीच अलाबेल नाही, असे ते म्हणाले.
NCP : पवारांचा सेफ गेम! चव्हाणांना पाठिंबा देत अजितदादांच्या खांद्यावर ठेवली बंदूक
संजय राऊत रोजच बोलत असतात सकाळचे, ते काही महाराष्ट्राला नवीन नाही, ते जे बोलतात ते जे लिहितात त्याची कोणी राजकीय दाखल घेत नाही. तसेच एखादी गोष्ट दरोरोज व्हायला लागली की लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि तसेच साडे नऊ च्या इव्हेंटचे झाले आहे. अशी खोचक टीका उदय सामंत यांनी केली.
तसेच अजित पवार नाराज आहेत कि नाही याचे उत्तर अजित पवार देऊ शकतील, अजित पवारांचे महाराष्ट्रातील राजकीय वलय हे वेगळे आहे त्यांची ताकद वेगळी आहे. त्यांचा प्रशासनातला अवका वेगळा आहे.त्यांच्याकडेही कार्यकर्त्यांचा आमदारांचा संच वेगळा आहे त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात त्यांची दाखल घेतली जाते, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, त्यात आम्ही बोलणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.
शकुनीमामाचं मिशन फत्ते! पवारांची भाकरी, सामनात पेढे; राणेंची राऊतांवर टीका
राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोणाची नेमणूक करावी किंवा न करावी ही त्यांची राष्ट्रीय कार्यकारणी निर्णय घेत असते. परंतु महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये हा संभ्रम आहे. कि अजित पवार यांचा नेमका रोल काय आहे. त्यांच्याकडे कोणती जबाबदारी आहे. आत्ता निवडणुकांचीही जबाबदारी अजित पवार यांच्याकडे नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असे सामंत म्हणाले.
यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदे व भाजप यांच्यात डोंबिवली येथे सुरु असलेल्या वादावरदेखील त्यांनी थेट भाष्य केले. डॉ. श्रीकांत शिंदेचे वक्तव्य सुस्पष्ट होते, जर एखाद्या बद्दल युतीत जर तणाव निर्माण होत असेल तर मी बाहेर पडतो. हा संदेश त्यांनी भाजप व शिसेनेच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना दिला आहे. कोणत्याही कारणास्तव युती तुटता कामा नये आपण सर्वांनी एकत्रित निवडणुकीला सामोरे जायचे आहे. आपल्याला विरोधकांवर कुरघोडी करायची आहे. तसेच युतीत मिठाचा खडा वैगरे काही नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परिपक्कव राजकारणी आहेत, बाकीच्यांसारखे अपरिपक्वव नाही. त्यामुळे आम्ही युतीनेच निवडणुकीला सामोरे जाऊ, असे ते म्हणाले.