Download App

शिंदेंच्या मंत्र्याने केला अजितदादांविषयी खळबळजनक दावा; म्हणाले ते अस्वस्थ

Dada Bhuse On Ajit Pawar :  गेल्या काही दिवसांपासून राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्याविषयी अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत. अजित पवार हे भाजपासोबत जाणार असे बोलले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, सुप्रीम कोर्टातून 16 आमदार अपात्र झाल्यावर अजित पवार हे भाजपसोबत जाणार असे त्या म्हणाल्या होत्या. यानंतर आता शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी देखील भाष्य केले आहे.

दादा भुसे म्हणाले की, अजित पवार यांच्याबाबत मला माहिती नाही. वरिष्ठ पातळीवर या गोष्टी सुरु आहेत. अजितदादा अस्वस्थ आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दादा अस्वस्थ असल्याचे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे काहीही होऊ शकतं, असे ते म्हणाले आहेत. दादा भुसेंच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

विरोधकांच्या एकजुटीसाठी शरद पवार हे राहुल गांधी, खर्गेंच्या भेटीला

दरम्यान दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली होती. तेव्हा त्यांनी महाविकास आघाडीतील कोणी नेता फुटल्यास तो त्याचा वैयक्तिक निर्णय असेल, असे म्हणत आपले शरद पवारांनी आपले हात वर केले आहेत. त्यामुळे शरद पवारांनी आपल्या वाक्यातून संदिग्धता कायम ठेवली आहे.

Prithviraj Chavan मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते?

दरम्यान, दादा भुसे यांनी यावेली मविआवर देखील निशाणा साधला आहे. सध्या विकासकामे होत आहेत. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे.विकासावर बोलायला कोणी तयार नाही, असे ते म्हणाले आहेत.

Tags

follow us