Download App

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना iPhone वापरण्याच्या सूचना ? अंबादास दानवे म्हणाले…

औरंगाबाद : महाराष्ट्रात शिवसेनेना (Shivsena) पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आयफोन (IPhone) वापरण्याच्या सूचना देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर वॉच ठेवला जातोय, मोबाइल ट्रेस केले जात असल्याची चर्चा सुरु आहे. यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांना सुरक्षेच्या कारणास्तव आयफोन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याच्या चर्चांना अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी फेटाळून लावलंय.

आमच्यावर दबाव असला तरी आम्ही कोणाला घाबरत नाही. मी विरोधी पक्षनेता म्हणून तसेच शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करतो. कुणाला पाहिजे असतील तर मी स्वतः माझ्या ऑडिओ क्लिप देतो, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलंय. शिवसेनेच्या नेत्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना आहेत, या चर्चांना अंबादास दानवे यांनी फेटाळून लावलंय.

ते म्हणाले की, अशा कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाहीत. राज्य सरकारची यंत्रणा आमच्यावर नजर ठेवून राहत असते. एकमेकांना ही यंत्रणा निरोप देत असते. पण आम्ही त्यांनी घाबरत नाहीत. आम्ही तर खुल्या दिलानं काम करत आहोत. कोणते नेते कोणाकडे जात आहेत, यावर नजर ठेवली जात असतेच. राज्य सरकार निश्चित दबाव टाकत असते. याला नोटीस दे, त्याला नोटीस दे, त्याच्यावर गुन्हा दाखल कर हे धंदे आहेत. मात्र याची भीती कधी आम्हा शिवसैनिकाच्या मनात राहिली नाही. कुणीही गुन्हे दाखल करो किंवा फोन रेकॉर्ड करो, याने आम्हाला काय फरक पडत नाही.

Tags

follow us