Download App

अंधारेंनी स्वतःला सिद्ध केलं; कायदेंनी फक्त आमदारकी भोगली : खासदार जाधवांचा हल्लाबोल

सुषमा अंधारे यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. अंधारे यांना पक्षात प्रवेश घेतल्यानंतर ज्या पद्धतीने त्या भारतीय जनता पक्षावर आणि सरकारवर तुटून पडल्या, ज्यापद्धतीने त्यांनी सगळी मांडणी केली. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. तेवढी तत्परता मनिषा कायंदे यांना दाखविता आली नाही. 6 वर्षांची आमदारकी निश्चित भोगली. पण त्या आमदारकीच्या काळामध्ये स्वतःचा परफॉर्म जेवढे दाखवायला पाहिजे तेवढे दाखवत आला नाही, असं म्हणतं शिवसेना (UBT) खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी शिवसेना (UBT) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं कौतुक केलं तर शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांच्यावर टीका केली. (Shivsena UBT MP Sanjay Jadhav Criticized Manisha Kayande And Appreciate Sushama Andhare)

लेट्सअप मराठीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये खासदार जाधव बोलत होतं. खासदार जाधव सध्या पंढरपूरच्या वारीत आहेत. यावेळी लेट्सअप मराठीने माळशिरसमध्ये जाधव यांची भेट घेतली.

काय म्हणाले खासदार जाधव?

सुषमा अंधारे यांच्यावर मनिषा कायंदे यांनी आरोप केले. पण अंधारे यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. त्यांना पक्षात प्रवेश घेतल्यानंतर ज्या पद्धतीने त्या भारतीय जनता पक्षावर आणि सरकारवर तुटून पडल्या, ज्यापद्धतीने त्यांनी सगळी मांडणी केली. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. तेवढी तत्परता मनिषा कायंदे यांना दाखविता आली नाही. 6 वर्षांची आमदारकी निश्चित भोगली. पण त्या आमदारकीच्या काळामध्ये स्वतःचा परफॉर्म जेवढे दाखवायला पाहिजे तेवढे दाखवत आला नाही.

आता अंधारेंवर आरोप करण्यासारखं काही आहे असं मला तरी वाटत नाही. पण उद्याची आपली स्पर्धक होऊ शकते आणि आता माझी मुदत संपत आली आहे, आता पुन्हा मला एका देतील मला वाटत गॅरंटी नाही. तिकडे गेले तर मला काही तरी मिळेल या आशेने गेलेल्या नेत्यांनी आभाळाकडे बघून थंकू नये असं मला वाटतं, अशीही टीका खासदार जाधव यांनी कायदे यांच्यावर केली.

कायंदे यांचा शिवसेनेत प्रवेश अन् अंधारेंवर टीका :

आमदार प्रा. मनीषा कायंदे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायंदे यांचे स्वागत करत त्यांची थेट पक्षाच्या सचिवपदी आणि प्रवक्तेपदी नियुक्ती केली. यावेळी शिवसेना सोडण्याचे कारण सांगताना त्यांच्या टीकेचा रोख हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर होता. यावर अंधारे यांनीही कायदेंना प्रतिउत्तर दिलं होतं.

एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना अधिकृत आणि ओरिजनल शिवसेना आहे. इमाने-इतबारे मी मागच्या शिवसेनेत काम केलं. पक्षाची भूमिका मी भक्कमपणे मांडली. परंतु मागच्या वर्षभरात काहीही ऐकूण घेतलं जात नव्हतं. देवीचा अवमान करणाऱ्यां आता टीव्हीवर ऐकावं लागत आहे. नवहिंदुत्व शिकवलं जात आहे. पक्षाचा डीएनए बदलायचा सुरु आहे, असं म्हणतं त्यांनी यावेळी बोलताना सुषमा अंधारेंवर थेट टीका केली.

अंधारे काय म्हणाल्या?

कायंदे यांच्या टीकेवर अंधारे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्या म्हणाल्या होत्या, एकादशीला मटण खाणाऱ्यांनी आम्हांला हिंदुत्व शिकवू नये. माझ्या गावाकडे म्हण आहे, निणंद्याला बारा बुद्ध्या. ज्याला नांदायचं नाही ते बारा कारणं सांगत असतात. गद्दार, खोकेवाले असं म्हणणाऱ्या कायंदे अचानक का बदलल्या? जाहीर कार्यक्रमांमध्ये त्या मला मला वाघिण म्हणत होत्या. अचानक त्यांना कोणतं हिंदुत्व आठवलं. भाजप सोडतांना त्या इकडे का आल्या होत्या. तेव्हा हिंदुत्व कुठं गेलं होतं? त्यांच्या हिंदुत्वामध्ये दुसऱ्याची संपत्ती हडप करणं बसतं का? भाजपच्या वरिष्ठ नेत्याची प्रॉपर्टी हडप करताना त्यांचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? हा आरोप मी नाही तर खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे.” असं म्हणतं अंधारे यांनी कायंदेंवर गंभीर आरोप केले.

Tags

follow us