Shocking! Head of a renowned educational institution ends his life sensation in Latur : गेल्या काही महिन्यांपूर्वी नीट परीक्षेतील पेपरफुटीमुळे चर्चेत आलेल्या लातूर शहरामध्ये पुन्हा एकदा प्रसिद्ध शिक्षणसंस्था चालकाने जीवन संपवल्याने खळबळ माजली आहे. संजीव सोनवणे असं त्यांचं नाव असून त्यांनी राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून स्वत: ला संपवलं आहे. दरम्यान त्यांनी मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. तरी देखील या घटनेचे नेमके कारण समोर आलेले नाही.
संजीव सोनवणे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघेही इंजिनिअर असून, सध्या परदेशात नोकरी करत आहेत. सोनवणे यांच्या पत्नी मुलीकडे गेल्या होत्या. त्यामुळे घटनेच्या वेळी सोनवणे हे घरी एकटेच होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोनवणे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, तसेच या घटनेशी संबंधित इतर बाबी काय आहेत? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांच्या अधिकृत तपासानंतरच या प्रकरणातील संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे.
कोण आहेत संजीव सोनवणे?
संजीव सोनवणे यांचा शैक्षणिक क्षेत्रात मोठा प्रवास आहे. त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयं आहेत. त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे वडिल चंद्रभानू सोनवणे हे छत्रपती संभाजीनगरच्या विद्यापीठात हिंदी साहित्याचे प्रमुख होते. त्यांनी बेंगळुरूतील सिद्धगंगा कलेज तुमकूर येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे.
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, गाडीत बसताच अश्रू अनावर, म्हणाले, मला मारायचं तर…
शैक्षणिक क्षेत्रात काम सुरू करताना त्यांनी बीडच्या परळीत कोचिंग क्लासेस सुरू केले. त्यानंतर 3 वर्षांनी 2000 ला लातूरमध्ये संकल्प कोचिंग क्लासेस सुरू केले. पुढे 2005 ला चंद्रभानू सोनवणे कॉलेजची स्थापना, बार्शीतील उकडगाव येथे शाळा आणि महाविद्यालय, तर 3 वर्षांपूर्वी त्यांनी पुण्यातील खडकवासला येथे शाळा आणि महाविद्यालय स्थापन केले आहे.
