थोरातांच्या मनात काय ? : शुभांगी पाटील यांच्यासाठी दरवाजे बंदच

नाशिक : नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituancy) महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील(Shubhangi Patil) आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे(Styajeet Tambe) यांच्यात थेट लढत आहे. सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्याकडून मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु आहे. दोन्ही उमेदवार मतदारसंघात प्रचारासाठी उतरले असून त्यांचे समर्थकही आज गावोगावी भेटीगाठी देत आहेत. दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु असतानाच […]

WhatsApp Image 2023 01 20 At 3.26.26 PM

WhatsApp Image 2023 01 20 At 3.26.26 PM

नाशिक : नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituancy) महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील(Shubhangi Patil) आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे(Styajeet Tambe) यांच्यात थेट लढत आहे. सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्याकडून मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु आहे. दोन्ही उमेदवार मतदारसंघात प्रचारासाठी उतरले असून त्यांचे समर्थकही आज गावोगावी भेटीगाठी देत आहेत. दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु असतानाच एक नवा ट्विस्ट पाहायला मिळालाय.

महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील संगमनेरमध्ये प्रचारासाठी गेलेल्या असता त्यांनी कॉंग्रसेचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी देखील भेट दिली. त्यावेळी त्यांना निवासस्थानाच्या सुरक्षा रक्षकाकडून त्यांची अडवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका हा बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला मानला जातो. थोरातांच्या बालेकिल्ल्यातच आज पाटील यांनी प्रचार सुरु केला आहे. आज पाटील या थोरातांच्या बंगल्यावर देखील आल्या होत्या.

यावेळी त्यांना बाळासाहेब थाोरात व त्यांच्या कुटुंबियांची भेट घ्यायची होती. त्यांच्यासोबत काही कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. परंतु निवासस्थानाच्या गेटवर पाटील आल्या असता त्यांना आतमध्ये प्रवेश दिला नाही. थोरातांच्या बंगल्यावरील सुरक्षारक्षकांसोबत त्यांच्याशी संवाद झाला.

यावेळी पाटील यांनी म्हंटलं की, “मी शुभांगी पाटील आहे, मी बाळासाहेब थोरातसाहेबांना यांना फोन केला आहे. मला आतमध्ये येऊ द्या. मला गेटमध्येही प्रवेश नाही का? तुम्ही साहेबांशी बोलून घ्या”, अशी विनवणी त्यांनी सुरक्षा रक्षकांकडे केली. मात्र, निवासस्थानी कोणीच नसल्याचं सुरक्षा रक्षकांकडून शुभांगी पाटील यांना सांगण्यात आलं. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीकडून शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यात आलेला असतानाही कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थाना त्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.

Exit mobile version