तुम्हाला मान्य नसेल तर पाकिस्तानात जा, सिद्धेश कदमांचा अमित ठाकरेंना थेट इशारा

शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सिद्धेश कदम यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत आक्रमक भूमिका घेतली आहे.

Untitled Design   2026 09 02T143324.884

Untitled Design 2026 09 02T143324.884

Siddhesh Kadam’s direct warning to Amit Thackeray : भाजप आणि मनसेमधील राजकीय वाद दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत असताना आता शिंदेसेनेनेही या वादात उडी घेतली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या एका वक्तव्यामुळे भाजप-मनसे वादाला आता शिंदेसेनेच्या भूमिकेचीही फोडणी मिळाली आहे.

मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात प्लास्टिक रिसायकलिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिद्धेश कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी प्लास्टिक रिसायकलिंग, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती याबाबत माहिती दिली. मुंबईतील विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना प्लास्टिक रिसायकलिंगची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली, तसेच त्यांना पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी प्रोत्साहित करण्यात आले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सिद्धेश कदम यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. जेन झी च्या दिशाभूल करण्याचा आरोप करत, भविष्यात प्लास्टिक रिसायकलिंग आणि खनिजांसंदर्भात शालेय विद्यार्थ्यांना माहिती व प्रोत्साहन देण्यावर आमचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर अमित ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका करताना कदम म्हणाले की, अमित ठाकरे यांचे वर्तन बालिशपणाचे आहे. आजच्या युवा पिढीला काय हवे आहे, हे त्यांना समजत नाही. कुठेही आक्रमकता दाखवण्याची भूमिका योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

आता ‘जिथे शिंदे, तिथे सौदा’ अशी नवी डिक्शनरी; पक्ष अन् चिन्ह सुनावणीपूर्वी राऊतांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना सिद्धेश कदम यांनी आक्रमक शब्दांत प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, हे विसरता कामा नये. जगाच्या नकाशावर मोदी साहेबांचे वर्चस्व आहे. तुम्हाला ते मान्य नसेल तर तुम्ही पाकिस्तानमध्ये जा. तुम्ही भारतात कशाला राहता? असा सवाल त्यांनी केला. कदम यांच्या या वक्तव्यामुळे भाजप आणि मनसेमधील सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला आता शिंदेसेनेच्या आक्रमक भूमिकेचीही जोड मिळाली आहे. अमित ठाकरे यांच्या भूमिकेवरून सुरू झालेला वाद आता भाजप, मनसे आणि शिंदेसेना या तीन पक्षांमध्ये अधिक रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, सिद्धेश कदम यांच्या पाकिस्तानमध्ये जा या वक्तव्यावर मनसेकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, तसेच अमित ठाकरे किंवा पक्षातील वरिष्ठ नेते यावर प्रत्युत्तर देतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या वक्तव्यावरून भाजप, मनसे आणि शिंदेसेनेतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version