श्री सिद्धेश्वर यात्रेतील भाकणुकीत 2023 वर्षात नैसर्गिक आपत्तीचे संकेत

सोलापूर : येथील श्री सिद्धेश्वर यात्रेतील भाकणुकीत नैसर्गिक आपत्तीचे संकेत दिसत असल्याचं मत मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी व्यक्त केलं. यंदा मुबलक पाऊस पडणार असून, जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर राहणार असल्याचा अंदाजही हिरेहब्बू यांनी व्यक्त केलाय. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील होम विधीचा सोहळा रविवारी रात्री संपन्न झालाय. होमविधीचा सोहळा आटोपल्यावर रात्री मानाचे सातही नंदीध्वज डॉ. […]

Siddheshwar

Siddheshwar

सोलापूर : येथील श्री सिद्धेश्वर यात्रेतील भाकणुकीत नैसर्गिक आपत्तीचे संकेत दिसत असल्याचं मत मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी व्यक्त केलं. यंदा मुबलक पाऊस पडणार असून, जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर राहणार असल्याचा अंदाजही हिरेहब्बू यांनी व्यक्त केलाय. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील होम विधीचा सोहळा रविवारी रात्री संपन्न झालाय. होमविधीचा सोहळा आटोपल्यावर रात्री मानाचे सातही नंदीध्वज डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहासमोर विसावले. त्यानंतर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला.

सिद्धेश्वर यात्रेत दिवसभर उपाशी ठेवलेल्या देशमुखांच्या शेतातील वासराला भाकणूकस्थळी आणण्यात आले. यावेळी राजशेखर देशमुख यांनी वासराची पूजा केली. सुरुवातीलाच वासरानं मूत्र आणि मल विसर्जन केलं. त्यावरून भरपूर पाऊस पडणार असल्याचं भाकीत हिरेहब्बू यांनी केलं. वासरू सुरवातीपासून बिथरल्याचं पाहायला मिळालं. त्याच्या अंदाजावरून नैसर्गिक आपत्तीचे संकेत असल्याचं मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितलं.

यावेळी मानकरी यांनी सांगितलं की, गत 25 वर्षात मी पहिल्यांदाच वासराला इतक्या आक्रमक रुपात पाहिलंय. हे नैसर्गिक आपत्तीचं लक्षण आहे. 1993 साली किल्लारीच्या भूकंप आधी देखील वासरू अशाच प्रकारे बिथरलेले होते. त्यानंतर पाहिल्यांदाच अशा पद्धतीनं वासरू बिथरुन जोरजोरात ओरडत होतं. त्यामुळं हे नैसर्गिक आपत्तीचे संकेत देणार असल्याची प्रतिक्रिया मानकरी हिरेहब्बू यांनी दिली.

Exit mobile version