Download App

ब्रेकिंग! महाकुंभात पवारांच्या बड्या नेत्याचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर…

Solapur Former Mayor Municipal Corporation Death In Mahakumbh : प्रयागराजमध्ये कालपासून महाकुंभाला सुरूवात झालीय. महाकुंभाच्या दुसऱ्या दिवशीच एक मोठी दुर्घटना समोर आलीय. महापालिकेचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते महेश कोठे (Mahesh Kothe) हे देखील महाकुंभाला गेले होते. त्यांना महाकुंभात (Mahakumbh) स्नान करत असताना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला अन् त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

VIDEO : संतोष देशमुखांची हत्या, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? धसांनी केला मोठा गौप्यस्फोट

ही घटना आज सकाळी घडलेली आहे. सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते महेश विष्णूपंत कोठे यांचं उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते साठ वर्षांचे होते. या घटनेमुळे सोलापूर शहरावर मोठी शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश कोठे मित्रांसोबत कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला गेले होते.

Video : बीड कुणामुळं बदनाम झालं?, पंकाज मुंडे अन् धनंजय मुंडेंच नाव घेत धस यांचा जोरदार पलटवार

प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात आज सकाळी ते स्नान करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला. या घटनेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे. कोठे यांचं शहरातील मुरारजी पेठेतील घरासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सकाळपासून झालेली नाही. महेश कोठे यांची सोलापूर महापालिकेच्या राजकारणावर वर्चस्व असलेला नेता अशी ओळख होती. पद्मशाली ज्ञाती संस्थेचे प्रमुख म्हणून देखील कोठे यांनी काम पाहिलंय.

विधानसभा निवडणुकीत कोठे यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. शहराच्या राजकारणातील एक धुरंधर नेता हरपल्याची संवेदना शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली जातेय. महाकुंभाचा काल पहिलाच दिवस होता. याठिकाणी भक्तांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. काल जवळपास दीड कोटी लोकांनी महाकुंभात हजेरी लावलेली होती.

 

follow us