Wardha News: वाढदिवसाला केक कापताय आणि सोबतच विविध स्प्रे आणि फायर गन चाही वर्षाव करताय. तर जरा जपून. हे सांगायचे करण म्हणजे वर्ध्यात वाढदिवसाचा केक कापताना असाच फायर गन आणि विविध स्प्रेचा वापर पार्टीमध्ये केलाय. ( Wardha News) आणि केक कापताना बर्थडे बॉयच्या तोंडाला आग लागलीय. ( Viral Video) वर्ध्याच्या सिंदी मेघे येथे हा धक्कादायक प्रकार घडला.
Wardha: वाढदिवसाचा केक कापताना बर्थडे बॉयच्या तोंडाला लागली आग#Wardha #WardhaNews #crime pic.twitter.com/cxOu69Gnnk
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 19, 2023
बर्थडे बॉयच्या तोंडाला आग लागतानाचा हा विडीओ हाती लागला आहे. रितीक वानखेडे असं बर्थडे बॉयचं नाव असून तो काल सायंकाळी आपल्या मित्रांसोबत केक कापत होताय. वकेक कापताना स्प्रे तोंडावर मारला गेला. याचवेळी ‘फायर गन’ मधून निघालेली ठिणगी स्प्रेवर पडल्याने आग लागलीय. बर्थडे बॉय रितीक किरकोळ जखमी झाला, त्याच्यावर उपचारही झाले आहेत. त्याच्या कानाला आणि नाकाला किरकोळ जखम झाली आहे. पण हे थोडक्यात निभावले आहे.
नेमकं काय घडलं?
वर्ध्याच्या सिंदी मेघे इथे हा धक्कादायक प्रकार घडला. रितीक वानखेडे हा तरुण काल सायंकाळी आपल्या मित्रांसोबत बर्थडे सेलिब्रेट करत होता. यावेळी मित्रांनी त्याच्या तोंडावर स्प्रे मारला. त्याचवेळी एकाने फायर गनचा वापर केला. ‘फायर गन’मधून निघालेली ठिणगी रितीक वानखेडेच्या तोंडावरील स्प्रेवर पडल्याने आग लागली. यानंतर तिथे एकच खळबळ माजली. रितीकच्या तोंडाला लागलेली आग विझवण्यात आली आणि त्याला उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा
काय काळजी घ्याल?
लग्न किंवा कोणत्याही पार्टीच्या प्रसंगी असे स्प्रे वापरताना आपण खूप काळजी घेतली पाहिजे. याचा वापर करताना सावधगिरी बाळगली नाही तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. या प्रकारचे स्प्रे वापरताना, लक्षात ठेवा की आजूबाजूला कुठेही आगीचा स्त्रोत नाही. जवळपास कुठेतरी आग लागल्यास अशा प्रकारचे स्प्रे वापरणे टाळा. डोळा हा संवेदनशील अवयव असल्याने अशा प्रकारच्या स्प्रेची फवारणी एखाद्याच्या डोळ्यात करू नये.