Download App

मी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो! उद्धव ठाकरेंनी भर सभेत जोडले हात

मी महाराष्ट्राची माफी मागतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.

Image Credit: letsupp

Uddhav Thackeray : मी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो. 2014 आणि 2019 ला मीच मोदींना मत द्या म्हणू तुमच्याकडं आलो होतो. ती आमची चूक होती असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जनतेसमोर माफी मागितली. (Uddhav Thackeray) त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. (Uddhav Thackeray) यावेळी मोदी घराणेशाहीवरून टीक करतात तर तुम्ही वंशावळ आणा असं आव्हान ठाकरेंनी मोदींना यावेळी दिलं.

 

विष आता बाहेर पडत आहे

रेल्वे स्टेशनवर चहा विकला, बांगला देशाच्या स्वातंत्र युद्धात होते. कधी म्हणतात हिमालयात गेलो. इतक्या थापा मारतात. मात्र, आमची2014 2019 ला मोठी चूक झाली. आम्ही यांच्यासाठी मत मागितली. परंतु, यांच्या मनामध्ये जे विष आहे ते आता बाहेर पडत आहे असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसंच, आमच्याशी गद्दाी केली असंही ते म्हणाले.

 

करेक्ट कार्यक्रम केला

माझी सोन्यासारकी शिवसेना आणि धनूष्यबान हिसकावून घेतला. परंतु, लक्षात ठेवा मोदींनी आमच्या पवित्र भगव्याला कलंकीत केलं असंही ते म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचा मिंधे असा उल्लेख करत त्यांनी गद्दरी करून सांगितल आपण करेक्ट कार्यक्रम केला. परंतु, या कटात हे मोदी आमि शाहाही सहभागी आहेत असा घणाघात ठाकरेंनी यावेळी केला.

 

जिरेटोपचं दर्शन घेण्याची तुमची पात्रता नाही

छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप, आज माझ्या शेतकऱ्याची गांधीटोपी, रोज टोप्या बदलणारा माणूस तुम्हाला पंतप्रधान पाहिजे का असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.? प्रफुल्ल पटेल यांना सांगतो, पटेल तुम्ही वाटेल त्याच्या डोक्यावर माझ्या महाराजांचा जिरेटोप ठेऊ नका. मोदींची माझ्या महाराजांसोबत बरोबरी करायची पात्रता काय? महाराजांचं राज्य कसं चालत होतं? कुणी महिलेवर अत्याचार केला तर जिथल्या तिथे हातपाय तोडायचे. मग तो कुणीही असेल. मोदी काय करताय? मणिपूरमध्ये महिलांची कशी धिंड निघाली ते तुम्हा सर्वांना माहिती आहे. तिकडे जातच नाहीत. तिकडे जायची हिंमत नाही. ना मोदींची, ना अमित शाह यांची. जिथे माझे छत्रपती शिवाजी महाराज महिलेवर कुणी अत्याचार केला त्याचा शिरच्छेद करायचे. मोदी तुम्ही जाऊ शकत नाहीत महाराजांच्या जिरेटोपाला हात काय, तुमची जिरेटोपचं दर्शन घेण्याची सुद्धा पात्रता नाही असा थेट हल्लाबोल ठाकरेंनी यावेळी केला.

follow us

वेब स्टोरीज