सावध! राज्यात चार दिवस वादळी पाऊस अन् गारपिटी; ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert : राज्यातील काही भागात 17 मार्च ते 20 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : राज्यातील काही भागात 17 मार्च ते 20 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात 17 ते 20 मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता असल्याने रब्बी हंगामातील काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत असे आवाहन हवामान विभाग आणि कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्यात सध्या रब्बी हंगामातील पिकांची (Rabi Season Crops) काढणी जोराने सुरु आहे मात्र आता अवकाळी पावसाचे संकट आल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून किंवा झाकून ठेवावीत तसेच हवामानाच्या (Maharashtra Rain Alert) अपडेटवर लक्ष ठेवून शेतीचे कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं देखील हवामान आणि कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

राज्य सरकारकडून इशारा

राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. 18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

ई-रिक्षा व ई-बाईकसाठीही परवाना बंधनकारक ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा –

Exit mobile version