Download App

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच मद्यपी चालकांवर कठोर कारवाई होणार

Strict action against drunken drivers along with violation of rules : बेशिस्त वाहतुकीवर (Unruly traffic) नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागाकडून (Police Department) वेळोवेळी प्रयत्न केले जात आहेत. मात्र वाहतुकीचे नियम आपल्यासाठी नाहीत, अशा उत्साहात चालक वागतांना दिसतात. दरम्यान, आता अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द प्रशासनाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. याचाच भाग म्हणून परवाना नसताना बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या आणि दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या (Drunk driving) सार्वजनिक वाहतूक सेवेतील चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हे (श्रNon-bailable offences) दाखल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर या संदर्भातील कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, चालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचा जीव जाऊ नये, यासाठी कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक आहे.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीला पोलीस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाचे प्रधान सचिव, अतिरिक्त पोलीस परिवहन महासंचालक रवींद्र सिंघल, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आदी उपस्थित होते.

बेदरकार आणि मद्यपान करून निष्काळजीपणे वाहन चालवल्याने अपघात आणि निष्पाप प्रवाशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. 2021 मध्ये ओव्हर स्पीडिंगमुळे झालेल्या अपघातांची संख्या 20 हजार 860 इतकी आहे. तर यामध्ये 9,829 लोकांचा मृत्यू झाला आहे.

सेक्स वर्कर्सच्या मुलांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार; विशेष पॉक्सो कोर्टाची टिप्पणी

सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरविण्याच्या गृह विभागाच्या प्रस्तावावर बैठकीत चर्चा झाली. सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांवरील चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन प्रवाशांचा मृत्यू झाल्यास चालकांवर प्रभावी कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यासाठी या संदर्भात कायद्यात सुधारणा करायला हवी. यावेळी मुख्यमंत्री निर्देश दिले की,  परवान्याशिवाय वाहन चालवणाऱ्यांना आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना कायद्याच्या कक्षेत आणले पाहिजे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्री शिंदे यांनी माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-पुणे महामार्गावर उताराच्या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी सूचना फलकांसह रम्बलर लावण्यासारख्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

Tags

follow us