Download App

सुधीर तांबेंचं काँग्रेस रक्त.., Radhakrushna Vikhe Patil यांचा मिश्कील टोला

अहमदनगर : सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांचं काँग्रेसचे रक्त कमी व्हायला अजून थोडा वेळ लागणार असल्याचा मिश्किल टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe Patil) यांनी लगावला आहे. संगमनेरमधील लोणी गावात आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक पदवीधरसाठी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

तसेच नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांचाच विजय होणार असून सत्यजित तांबे यांना भाजपात येण्यासाठी आमचा आग्रह राहणार असल्याचंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय.

सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा विजय निश्चित असून अन्य उमेदवारांची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. मामांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, मामाने पक्षालाही मामा बनवले, अशी टीकाही विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केलीय.

बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्याच्या राजकारणातील प्रतिस्पर्धी मानले जातात. अशातच नाशिक पदवीधर निवडणुकीत बाळासाहेब थोरातांचे भाचे सत्यजित तांबे यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्याकडून पाठिंबा मिळाल्याने जिल्ह्यात हा चर्चेचा विषय बनलाय.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात जळगाव, अहमदनगर, धुळे, नाशिक जिल्ह्यांत पदवीधर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेस (Congress) पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला, मात्र त्यांनी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांचा अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडं भाजपकडून सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्यासाठी अनूकूल असल्याचं समोर आलं.

एकीकडे सत्यजित तांबेंना भाजपचा पाठिंबा असल्याचं बोललं जात असतानाच सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असा सल्ला राधाकृष्ण विखेंनी त्यांना दिला आहे. तर विखे यांच्याकडून फक्त सल्लाच नाहीतर सत्यजित तांबेंनी भाजपात येण्यासाठीचा आमचा आग्रह असल्याचंही म्हंटलंय.

Tags

follow us