“मी काँग्रेसच्या विचार सरणीची असली तरीही मी विरोधकांचा चांगला अभ्यास करते. कारण ते माझे वैचारिक विरोधक आहेत, शत्रू नाहीत. त्यांना समजून घेणं मला महत्वाच वाटतं,” अस मत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. ‘खासदार आपल्या भेटीला’ उपक्रमाच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती मधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला त्यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक आठवणीसह विद्यार्थ्याच्या प्रश्रांना उत्तर दिली.
यावेळी त्यांनी राज्यातील राजकिय परिस्थितीवर देखील भाष्य केलं. त्या म्हणल्या की गेल्या काही दिवसापासून राज्यातील सत्ताधारी आंतरजातीय विवाहाबद्दल बोलताना दिसत आहे. लग्न ही वैयक्तीत गोष्ट आहे त्यामुळे त्यावर त्यामुळे आंतरजातीय विवाह हे आमदार, खासदाराचं काम नाही. तुम्ही खड्डे बुजवा. उद्या अजित पवार येवून तुम्हाला सांगू शकत नाहीत की तू याच्याशी लग्न कर म्हणून. पण ते जय पवार, पार्थ पवार आणि रेवती सुळे यांना सांगू शकतात. वडील, मामा म्हणून. कसबा पोटनिवडणूकीदरम्यान भाजपकडून हेच चालू होत की, एक दिवस धर्मासाठी द्या आणि मतदान करा. त्याला लोकांनी नकार दिला आहे.
हेही वाचा : Rahul Gandhi At Cambridge : पेगॅससद्वारे माझ्या फोनची हेरगिरी, राहुल गांधींचा गंभीर आरोप
सात वर्षापासून सुप्रिया सुळे यांना संसदेमध्ये उत्कृष्ठ काम केल्याबद्दल सन्मान मिळतो आहे. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणल्या की मी संसदेत देशात पहिली कशी येते मलाही माहिती नाही. त्या म्हणाल्या की मी शाळेत कॅालेजमधे कधीही पहीली आले नाही. पण संसदेत देशात पहिली कशी येते मलाही माहिती नाही. त्या पुढे म्हणाल्या की मी पंचवीस वर्षापूर्वी असते तर या रूममध्येही मी आले नसते. कारण मी विचार केला असता की मला काय करायचंय.. पण आता मी विचार करते की मला काय बोलायचंय काय नाही?
त्या पुढे म्हणाल्या की मला असं वाटतं की मी आता अभ्यास करण्याच्या ऐवजी जर शाळेत एवढा अभ्यास केला असता. तर त्यावेळी इतका अभ्यास केला असता तर मी खासदार होण्याऐवजी राज्याची मुख्य सचिव किंवा एखाद्या कंपनीची सीईओ झाली असते. असही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.