Revati Sule Marriage : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचं लग्न ठरलं असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरचे सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती सुळेंचं लग्र ठरलं असल्याची माहिती माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत या लग्नाबाबत त्यांनी माहिती दिली आहे.
सारंग अरुण लखानी (Sarang Arun Lakhani) नागपूरचे असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मध्यस्थीने खासदार सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) मुलीचं लग्न ठरल्याची माहिती समोर येत आहे.
शरद पवारांचे होणारे नातजावई सारंग लखानी कोण?
शरद पवारांचे (Sharad Pawar) होणारे नातजावई सारंग लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. माहितीनुसार, सारंग लखानी एक चांगले बॅडमिंटनपटू देखील आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.
भाषेची अस्मिता म्हणजे आजार? राज ठाकरेंचा सरसंघचालकांवर तिखट वार-
कोण आहेत रेवती सुळे ?
खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांनी प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनामिक मधून पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत रेवती सुळे यांनी प्रथमच आपल्या आई सुप्रिया सुळेसाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतल्यानंतर रेवती सुळे सोशल मीडियावर चर्चेत आल्या होत्या.
