Download App

सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकारलं, म्हणाल्या सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही

मुंबई : राज्यातील (Maharashtra)शेतकरी (Farmer)-कष्टकरी जनतेचं दुःख किंवा म्हणणं जर सरकार समजून घेणार नसेल तर या सरकारला (Shinde-Fadnavis Government)सत्तेवर राहण्याचा अधिकार (authority)नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी (NCP)काँग्रेसच्या खासदार नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्वीट करत शिंदे-फडणवीस सरकारला फटकारलं आहे. ट्वीटमध्ये म्हटलंय की, या असंवेदनशील सरकारला शेतकरी-कष्टकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत का? असा संतप्त सवालही खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

शेतकरी आणि कष्टकरी आपल्या विविध मागण्यांसाठी विधानभवनाच्या दिशेनं चालत निघाले आहेत. हे ‘लाल वादळ’ नेमकं कशासाठी आणि काय आहे? हे किमान समजून घेण्याची संवेदनशीलता सरकारनं दाखविली पाहिजे, अशी मागणीही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

बारामतीत धक्कादायक घटना! दोन कुटुंबातील चौघांचा गुदमरुन मृत्यू…

दरम्यान स्वतः मुख्यमत्री एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेऊन या मोर्चाला सामोरं जाऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, असं स्पष्ट मतही खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.

शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेनं येत आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी काही मागण्या आहेत. शेतकरी, कष्टकरी आपल्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. या लॉंगमार्चमध्ये असंख्य शेतकरी कष्टकरी सहभागी झाले आहेत.

विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीनं हा लाँग मार्च काढण्यात आला आहे. शेतमालाचे पडलेले भाव हक्काच्या वन जमिनी, दिवसा वीज या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या किसान सभेच्या वतीनं करण्यात आल्या आहेत.

Tags

follow us