लोकांच्या घरामध्ये घुसून बायका-पोरांवर असा अन्याय करणं चुकीचं आहे, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर कडाडल्या आहेत. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणी एनसीबीचे तत्कालीन प्रमुख समीर वानखेडे यांची मागील दोन दिवसांपासून सीबीआय चौकशी सुरु आहे. त्यावर सुप्रिया सुळे बोलल्या आहेत.
PM Modi Papua New Guinea Visit: पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधान जेम्स मारापेनी धरले मोदींचे पाय
पुढे बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, समीर वानखेडे यांच्याबाबत नवाब मलिक जे बोलत होते ते आता खरं व्हायला लागलं आहे. शाहरुख हा मोठा अभिनेता आहे. त्याच्या मुलाबाबत असं होत असेल तर सामान्यांच्या मुलांचं काय हाल होत असतील? त्यामुळे समीर वानखेडे यांचा मुद्दा मी संसदेत मांडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच लोकांच्या घरामध्ये घुसून बायका-पोरांवर असा अन्याय करणं चुकीचं आहे. त्यामुळे या प्रकरणी सभागृहात आवाज उठवणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.
निर्मात्यांकडून धमकी, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘बावरी’चा गंभीर आरोप…
व्हॉट्सअप चॅटमध्ये आर्यन खानला क्रूज पार्टीसाठी तब्बल 27 लाखांची व्हीव्हीआयपी तिकीटं देण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. या क्रूज पार्टीचं प्रमोशन करण्यासाठी आर्यन खान व त्याच्या आठ मित्रांना ही तिकिटं देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
सीबीआयने FIR मध्ये समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खानला क्रुझवर ड्रग्ज प्रकरणात न अडकवण्याच्या बदल्यात 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आता वानखेडेंसह NCB च्या इतर आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सीबीआयच्या FIR मध्ये जेवढे आरोपी आहेत. या सर्व मोबाईलमधील डेटाचं विश्लेषण करण्यात आलं आहे.
मराठा समाजाचा आधार हरपला; विश्व मराठी संघटनेचे संस्थापक प्रवीण पिसाळ यांचे निधन
दरम्यान, SIT च्या अहवालानंतर सीबीआयकडून 29 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर वानखेडेंसह अन्य काही जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वानखेडेंसह सीबीआयच्या FIR मध्ये जेवढे आरोपी आहेत त्या सर्वांचे मोबाईल जप्त केले होते.
या सगळ्यामध्ये बॉलिवूड महत्त्वाची भूमिका बजावतं. कारण ड्रग्जचं व्यसन पसरवण्यासाठी आणि अधिकाधिक ग्राहक जमवण्यासाठी, ड्रग्जची विक्री करण्यासाठी बॉलिवूडमधील लोकांचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून किंवा मध्यस्थ म्हणून वापर केला जातो.
त्यामुळेच आर्यन खानला मोफत तिकिटं, मुली आणि ड्रग्ज मिळालं. कुणीही तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या नावाचा रेव्ह पार्टीची तिकिटं विकण्यासाठी वापर करू शकत नाही, असं या चॅटमध्ये समीर वानखेडे हे ज्ञानेश्वर सिंह यांना सांगताना दिसत आहे.