Download App

कांदा खरेदीचा निर्णय ऐतिहासिक, मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचे आभार

कांदा खरेदीचा आजचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, नाफेडच्या माध्यमातून 2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये दराने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

हा मस्तवालपणा खोक्यातून आला आहे; दादा भुसेंच्या विधानाचा राऊतांकडून खरपूस समाचार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कांद्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे दिल्लीला गेले होते. या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनूसार केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मंत्री अमित शाह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत चर्चा सुरु होती. चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

Ghoomer Movie: दिव्यांगांनीही पाहिला ‘घूमर’, चिमुकल्यांची अभिषेक, सैयामीशी मस्ती

नाफेड 2 लाख हेक्टर कांदा खरेदी करीत असून गरज भासल्यास केंद्र सरकारकडून आणखी सहकार्य मिळणार असल्याची ग्वाहीच अमित शाहांनी दिली आहे. नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी होणार हे पहिल्यांदाच इतिहासात घडत आहेत. इतकी मोठी कांदा खरेदी पहिल्यांदाच होतेयं, जेव्हा राज्य अडचणीत येतं, तेव्हा राज्य सरकारसह केंद्र सरकार मदतीला येतं, शेतकऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावात्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय अभिनंदनीय असल्याचं ते म्हणाले आहेत.

Ahmednagar News : ‘सेल्फी’ काढायला गेला अन् जीवच गमावला… रंधा फॉलमध्ये पडून तरुणाचा मृत्यू

केंद्र सरकारचा मोठा निर्णय :
कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्याच्या मुद्द्यावरुन राज्यात गदारोळ सुरु असताना केंद्र सरकारकडून मंगळवारी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. त्यानुसार केंद्र सरकार, नाफेड आणि एनसीसीएफ यांच्याकडून महाराष्ट्रात कांदा खरेदी केली जाणार आहे. निर्यातशुल्काच्या अटीमुळे राज्यातील बाजारपेठेत कांद्याचे भाव खाली पडण्याची भीती होती. मात्र, आता केंद्र सरकारकडून २४१० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदीची हमी मिळणे हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. केंद्र, सरकार, नाफेड आणि एनसीसीएफ यांच्याकडून नाशिक, लासलगाव आणि अहमदनगर याठिकाणी कांदा खरेदी केली जाईल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी दिली.

दरम्यान, कांद्याची साठवणूक क्षमता वाढवण्याबाबत, अनुदान वाढवण्याबाबत अजित पवार आणि माझ्यात चर्चा सुरु असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, अनिक काकोडकर समितीच्या शिफारशींवरही काम सुरु असल्याचं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us