एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाणे शहर चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा ठाणे शहर चर्चेत आले आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कशिश पार्क येथे नवं मुख्यमंत्री कार्यालय होणार आहे. याशिवाय आयुक्त कार्यालय आणि शासकीय कृषी विभागाचे कार्यालय देखील येथे उभारण्यात येणार आहे.
ठाणे शहरातील कशिश पार्क येथे प्रशासकीय इमारत असून याच इमारतीत ही कार्यालये होणार आहेत. त्यामुळे यापुढे राज्याचा कारभार ठाण्यातून देखील होताना दिसणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे शहर हे महत्वाच आहे. ते अनेक वर्ष येथूनच आमदार म्हणून निवडून येतात. त्यामुळे ते मुख्यंमत्री झाले तरी त्यांचं ठाणे शहरावर विशेष प्रेम आहे.
Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत हालचाली, ‘या’ नेत्याने दिला दुजोरा
कशिश पार्क येथे नवं मुख्यमंत्री कार्यालय होणार आहे. त्यासाठी त्या ठिकाणच्या कार्यालयाच्या अंतर्गत कामांसाठी तसेच संगणक प्रणाली, इतर कामासाठी ठाणे महापालिकेने निविदा काढली आहे. ही निविदा 3 मे पर्यंत स्वीकारली जाणार आहे. या कामासाठी एकूण 4 कोटी 60 लाख इतका खर्च येणार आहे.
Abdul Sttar : हनुमानासारखा भक्त असतो तर….; विखेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सत्तारांचं मोठ विधान